Team WebNewsWala
तंत्रज्ञान राष्ट्रीय व्यापार

आत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद

Aatmnirbhar bharat

चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या भागीदारी अंतर्गत नीति आयोगाने डिजिटल इंडिया आत्मनिर्भर इनोव्हेट चँलेंज सुरू केले होते.

या अंतर्गत मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि फोटो मीडिया अशा 8 प्रकारात अ‍ॅप बनवायचे होते. या चॅलेंजमध्ये विजेत्या कंपन्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देखील मिळणार आहे.

या चॅलेंज अंतर्गत आतापर्यंत एकूण 6,940 अ‍ॅप्स मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत. ज्यात 3,939 वैयक्तिगत आणि 3,001 संस्थेशी संबंधीत आहेत. केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

ट्विटनुसार, 6,940 एंट्रीज पैकी 1,140 अ‍ॅप्स बिजनेसचे, 901 हेल्थ अँड वेलनेसचे, 1,062 ई-लर्निंग, 1,155 सोशल नेटवर्किंग, 326 गेम्स, 662 ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम, 237 न्यूज, 320 इंटरटेनमेंट आणि 1,135 अ‍ॅप्स वेगळ्या कॅटेगरीजमधील आहेत.

दरम्यान, याआधी या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 18 जुलै होती. मात्र नंतर ती वाढवून 26 जुलै करण्यात आली होती.

हे ही वाचा

चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

Online Shopping करताना सावधान नकली सामान देऊन फसवणूक

Team webnewswala

WhatsApp सेंड करण्याआधी ऐका Voice Massage

Web News Wala

1 comment

आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंज, चिंगारी ठरले सर्वोत्कृष्ट - Web News Wala August 9, 2020 at 11:09 am

[…] सरकारने काही दिवसांपुर्वी आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंज ची घोषणा केली होती. आता या चॅलेंज्या […]

Reply

Leave a Reply