Team WebNewsWala
मनोरंजन

HR is Back 14 वर्षांनी येणार ‘सुरूर 2021’

आता तब्बल १४ वर्षांनी ( HR )हिमेश रेशमिया 'सुरूर 2021' या नव्या अल्बम सॉंगमधून पुन्हा एकदा आपल्या गाण्यांसोबत दमदार एन्ट्री करतोय.

HR is Back 14 वर्षांनी येणार ‘सुरूर 2021’ 

Webnewswala Online Team – बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचा संगीत दिग्दर्शक आणि गायक ( HR )हिमेश रेशमियाचा अगदी सगळ्यात पहिला अल्बम म्हणजे २००७ साली आलेला ‘आप का सुरूर’. या अल्बममधील तेरा सुरूर, नाम है तेरा अशी सारी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘तेरा सुरुर’ गाण्यामुळे गायक हिमेश रेशमिया अगदी एका रात्रीत प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आला होता. त्यानंतर आता तब्बल १४ वर्षांनी (HR) हिमेश रेशमिया ‘सुरूर 2021’ या नव्या अल्बम सॉंगमधून पुन्हा एकदा आपल्या गाण्यांसोबत दमदार एन्ट्री करतोय.

१४ वर्षांनी हिमेश रेशमिया ‘सुरूर 2021’ या नव्या अल्बम सॉंगमधून करतोय दमदार एन्ट्री

त्याच्या कॅपवर लिहिलेले HR त्याच्या गाण्यांचा म्यूजिक लेबल असून ‘हिमेश रेशमिया मेलोडीज’ लॉंच करण्यात आले आहे अशी घोषणा केली आहे. हा टीझर शेअर करताना हिमेशने सोबत एक कॅप्शन देखील लिहिले आहे. ‘सुरूर २०२१’ अल्बमचे टीझर पोस्टर. खूप सारं प्रेम.’, असे लिहित त्याने यात लाला रंगाचे हार्टचे इमोजी वापरले आहेत. तसेच #loveyou हा हॅशटॅग देखील त्याने या पोस्टमध्ये वापरलाय. हिमेशने त्याच्या आगामी ‘सुरूर २०२१’ बद्दल बोलताना म्हटले आहे कि, ‘लॉकडाऊन काळात बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या म्यूजिक लेबलच्या गाण्यासाठी काम करत होतो.पण आता प्रतिक्षा संपली आहे. मी जे लोकांसाठी कंटेट घेऊन येतोय ते योग्यच असणार आणि त्यात मी समाधानी आहे. माझा म्यूजिक लेबल हा सर्व संगीत प्रेमींसाठी आहे.’

नुकतंच हिमेशच्या नव्या गाण्याचं टीझर मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. हिमेश रेशमियाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या नव्या अल्बमचे टीझर पोस्टर रिलीज केले आहे. या टीझर पोस्टरमध्ये हिमेशच्या जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्टरच्या माध्यमातून त्याच्या जुन्या अंदाजाची झलक पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पहायला मिळाली आहे. तसेच यात बॅकग्राऊंडला प्रेक्षकही दाखवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये त्याच्या आयकॉनीक कॅपवर ‘एचआर’ असे लिहिलेले दिसत आहे.

Web Title – HR is Back 14 वर्षांनी येणार ‘सुरूर 2021’ ( HR is Back ‘Surur 2021’ to come after 14 years )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

BARC कडून पुढील 12 आठवडे TRP वर बंदी

Team webnewswala

अक्षय कुमारने लॉन्च केला FAUG चा टीझर

Team webnewswala

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

Team webnewswala

Leave a Reply