Team WebNewsWala
आरोग्य शहर

कोरोना लस साठी असे करा रजिस्ट्रेशन

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्यान १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे.
कोरोना लससाठी असे करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. रजिस्टर कसे करायचे, जाणून घ्या.

कोरोना लससाठी असे करा रजिस्ट्रेशन :

सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. याला एन्टर करून व्हेरिफाय बटनवर क्लिक करा.
या वेबसाइटवर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला Registration of Vaccination वर आणले जाईल. या ठिकाणी तुम्हाला फोटो आयडी टाइप, फोटो आयडी प्रूफ नंबर, नाव, जन्म दिनांक, जेंडल आणि अन्य डिटेल्स भरावे लागणार आहे. यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे लागेल.

तुम्हाला एसएमएस द्वार सर्व आवश्यक डिटेल्स पाठवले जातील. सर्व डिटेल्स तपासून घ्या. या ठिकाणी तुम्हाला Beneficiary Reference ID दिला जाईल. याला सेव करुन ठेवा.

अकाउंटला ३ लोकांसोबत लिंक शेयर करू शकता

तुम्ही या अकाउंटला ३ लोकांसोबत लिंक शेयर करू शकता. यासाठी तुम्हाला उकाउंट डिटेल्स पेजच्या खाली दिलेल्या अॅड मोअर बटनवर क्लिक करावे लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही डिटेल्स भरली होती. तितकीच तुम्हाला डिटेल्स एन्टर करावी लागेल.
आपल्या जवळच्या सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जाऊन खाली बाजूस स्क्रॉल करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला मॅप आणि डायलॉग बॉक्स दिसेल. त्यात तुम्हाला एन्टर प्लेस, अॅड्रेस, लोकेशन इत्यादी डिटेल्स एन्टर करावे लागतील त्यानंतर गो बटनवर टॅप करावे लागेल.

अपॉइंटमेंट अकाउंट डिटेल पेजवर

अपॉइंटमेंट स्केड्यूल करण्यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल पेजवर जावे लागेल. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर जावे लागेल. त्यानंतर स्केड्यूल अपॉइंटमेंट बटनवर क्लिक करू शकता. असे केल्यानंतर तुम्हाला वॅक्सिनेशन पेजवर बुक अपॉइंटमेंट वर पोहोचवले जाईल. या पेजवर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटरचा पर्याय निवडू शकता.

डिटेल्सला चांगल्या प्रकारे चेक करून ठरल्या वेळेला लस घ्या

ज्यावेळी तुम्ही सेंटरचा पर्याय करता. त्यावेळी तुम्हाला स्लॉट दिसेल. यानुसार स्लॉट निवडा. यानंतर बुक बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज ओपन होईल. सर्व डिटेल्सला चांगल्या प्रकारे चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्या ठरल्या वेळेला लस घ्या.
कोविड १९ लस सर्टिफिकेटला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला cowin.gov.in वर जावे लागेल. याशिवाय, Aarogya Setu अॅपवर सुद्धा जाऊ शकता. आरोग्य सेतू अॅपवर गेल्यानंतर कोविन टॅप वर जावे लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जावे लागेल. यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागेल नंतर Get Certificate बटनवर क्लिक करावे लागेल. या सर्टिफेकट मध्ये नाव, जन्म दिनांक, बेनिफिशियरी रेफरेंन्स आयडी, फोटो ओळखपत्र, लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हे सर्व उपलब्ध असेल.

CoWin वेबसाइट वरून करा सर्टिफिकेट डाउनलोड

CoWin वेबसाइट वरून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://selfregistration.cowin.gov.in/vaccination-certificate वर जावे लागेल. त्यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा सर्च बटनवर टॅप करून सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागेल.

लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत 

आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.

Title : कोरोना लस साठी असे करा रजिस्ट्रेशन how to Register for Corona Vaccine

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस कोरोना विषाणू

Web News Wala

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

Web News Wala

Versova Sea Link कामाला गती

Web News Wala

1 comment

कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1 - Team WebNewsWala May 25, 2021 at 5:20 pm

[…] कोरोना लस साठी असे करा रजिस्ट्रेशन […]

Reply

Leave a Reply