Team WebNewsWala
आरोग्य

मधुमेह पासून करा बचाव या सोप्या उपायांनी

एकदा मधुमेह झाला तर तो बरा होऊ शकत नाही, पण काही उपायांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे.

मधुमेह पासून करा बचाव या सोप्या उपायांनी

भारतात कोट्यावधी लोकं मधुमेहाच्या विळख्यात सापडलेले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले अयोग्य जीवनशैली व अयोग्य खानपान. एकदा मधुमेह झाला तर तो बरा होऊ शकत नाही, पण काही उपायांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे.

आज आपण असाच एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय तुम्ही पंधरा दिवस सातत्याने केला तरी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात येईल कारण एक तर मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनची निर्मितीचे प्रमाण मंदावलेले असते किंवा ते थांबलेली असते. अशा या घरगुती उपायांमुळे इन्शुलिनच्या निर्मितीला चालना मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय नेमका काय आहे.

आवळा पावडर

मधुमेहावर गुणकारी ठरणारा असा उपाय बनवण्यासाठी आपल्याला तीन घटक लागणार आहे . त्यातील पहिला घटक म्हणजे आवळा पावडर. शुगर असणाऱ्या व्यक्तींसाठी आवळा पावडर अतिशय उपयुक्त असते कारण यामध्ये क्रोमियम नावाचे पोषक तत्व उपलब्ध असते. जे शरीरातील इन्शुलिन मात्रा वाढवण्यास मदत करते. जेणे करून रक्ताचे साखरेतील रूपांतर एनर्जीमध्ये होते आणि पर्यायी रक्तातील साखर नियंत्रणात येते.

आपण आपल्या उपायासाठी दोन चमचे एवढी आवळ्याची पावडर आपल्याला घ्यायची आहे. ही आवळा पावडर कोणत्याही मेडिकल तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते.

कडुनिंबाच्या पानांची पावडर

यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कडुनिंबाच्या पानांची पावडर. निम पावडर या नावाने ही पावडर आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होत राहते.ग्रामीण भागामध्ये कडुनिंबाची झाडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात म्हणूनच अनेक ठिकाणी कडुलिंबाची ताजी पाने उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर सुद्धा केली जाते.

रक्त शुद्धीकरण करून इन्शुलिनच्या चालनेला निर्मिती करण्याचे काम कडुलिंबाची पावडर करत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा चमचा कडुलिंबाची पावडर घ्यायची आहे.

मेथीचे दाणे

यानंतर चा तिसरा घटक म्हणजे मेथीचे दाणे. कोणताही किरणाच्या दुकानामध्ये मेथीचे दाणे सहज उपलब्ध होतात. ते दाणे घरी आणून त्याची बारीकशी पावडर करून घ्यायची आहे.शुगर असणाऱ्या व्यक्तीने शक्य तेवढे कडू पदार्थ खाणे गरजेचे असते कारण की यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात राहते. हा उपाय करण्यासाठी एक चमचा मेथी दान्याची पावडर आपल्याला घ्यायची आहे. आता हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित मिश्रित करायचे आहेत. त्याचबरोबर सकाळ-संध्याकाळ कमीत कमी ४५ मिनिटे चालण्याचा उपायसुद्धा आवश्यक आहे.

सलग पंधरा दिवस हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत

आहारातून गोड पदार्थ कमी करायला हवेत त्याचबरोबर सातत्याने रक्‍ताची तपासणी सुद्धा करायला हवी.हे तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला उपाय तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये हे मिश्रणाची पावडर टाकायचे आहे. हा उपाय आपल्याला रोज सकाळ संध्याकाळी उपाशीपोटी करायचा आहे . सलग पंधरा दिवस हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

करोनाबाधित पोलिसांची संख्या१० हजारांच्या घरात

Team webnewswala

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री

Web News Wala

CoronaVirus News ‘या’ देशात झाला कोरोनाचा अंत

Web News Wala

Leave a Reply