Team WebNewsWala
इतर राष्ट्रीय शहर

आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर

बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या 24 तासात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसाचं सावट आता महाराष्ट्रावर देखील आहे

बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या 24 तासात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसाचं सावट आता महाराष्ट्रावर देखील आहे. महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचे ढग येत आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात समुद्रकिनाऱ्या लगत 20 सेंटीमीटरपर्यंत पावासाची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या 24 तासात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसाचं सावट आता महाराष्ट्रावर देखील आहेभारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिलनाडु, महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडात देखील होऊ शकतो.

दुसरीकडे तेलंगणाच्या हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. 24 तासात 20 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला असून पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस

हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. बर्‍याच भागात गेल्या 24 तासांत सुमारे 25 सेमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक भागात पाणी साचले आणि पावसाच्या पाण्यात वाहने वाहू लागली. रस्त्यावर नाल्यांसारखे पाणी वाहू लागले होते.

एसडीआरएफकडून बचावकार्य

पाऊस पडल्यानंतर शहरातील खालच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक तैनात केले आहेत. एसडीआरएफची टीम शहरात बचावकार्य करत आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून परिस्थितीचा अहवाल मागवला आहे.

मुंबई, रायगड, कोंकण भाग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान 55-65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे देखील वाहू शकतात. जे नंतर 75 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचू शकतात. समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Lockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू

Web News Wala

विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर दखलपात्र गुन्हे

Team webnewswala

नक्की काय आहे शिवनागम मुळी म्हणुन पहिला जाणारा व्हिडिओ

Team webnewswala

Leave a Reply