Team WebNewsWala
आरोग्य मनोरंजन शहर समाजकारण

Covid Center मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा गरबा Video Viral

मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या नेस्को कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये खाटांभोवती असणाऱ्या जागेत गरबा चा सुरेख फेर धरला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या नेस्को कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये खाटांभोवती असणाऱ्या जागेत गरबा चा सुरेख फेर धरला गेल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या कोविड सेंटर मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला गरबा Video Viral

मुंबई : मागील काही काळापासून coronavirus कोरोना व्हायरसनं थेट आपल्या जीवनावर परिणाम केल्याचं पाहायला मिळत आहे. Mumbai मुंबईतही मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळं प्रशासनापुढं हे मोठं आव्हानच आहे. अशा परिस्थितीतच अनेक परींनी सकारात्मकता कशी राखली जाईल याकडेच अनेकांचा कल दिसत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळं सर्वत्र एक वेगळ्याच प्रकारची भीती पाहायला मिळत आहे. त्यामुळं या वातावरणातही येऊ घातेलल्या सण उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आता थेट कोविड सेंटरमध्येच काही कमालीची पावलं उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नवरात्रोत्सवाचा हा उत्साह कोविड सेंटरमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांचाही समावेश

सध्याच्या घडीला कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. पण, नवरात्रोत्सवाचा हा उत्साह कोविड सेंटरमध्ये मात्र तितक्याच धमाकेदार अंदाजात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर नुकताच याबाबतचा एक गरबा Video समोर आला आहे.

ज्यामध्ये मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या नेस्को कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये खाटांभोवती असणाऱ्या जागेत गरब्याचा सुरेख फेर धरला गेल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे.

सकारात्मकतेची एक वेगळीच उर्जा

सकारात्मकतेची एक वेगळीच उर्जा या वातावरणात पाहायला मिळत आहे. हे पाहता उत्सवाच्या या आनंदालाही आता वेगळ्या पद्धतीनं अनुभवण्याचं कसब सर्वांनीच आत्मसाद केलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुळात कोरोनावर मात करण्यासाठीची ही एकी पाहता येत्या काळात या व्हायरसवर मात करण्यातही यश येईल अशीच आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मोमोज खाताय तर सावधान…

Web News Wala

Mumuni School of Thoughts तर्फे ‘अर्थ’ पूर्ण व्याख्यानाचे आयोजन

Team webnewswala

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून ऑर्किड लागवडीचा प्रयोग यशस्वी

Team webnewswala

Leave a Reply