आंतरराष्ट्रीय आरोग्य

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही Home Quarantine

करोनाबाधित व्यक्तीच्या ते संपर्कात आल्याने त्यांनी आता Home Quarantine झाले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वार माहिती दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात अगदी सर्वसामान्यांपासून ते व्हीव्हीआयपी मंडळी देखील सापडल्याचे दिसून आले आहे. अद्यापही करोनाचा संसर्ग जगभरात सुरूच आहे. आता, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांना देखील याचा फटका बसल्याचे दिसत आहे. कारण, करोनाबाधित व्यक्तीच्या ते संपर्कात आल्याने त्यांनी आता Home Quarantine झाले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वार माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने, टेड्रोस यांनी Home Quarantine होण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही Home Quarantine

मी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्या कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी Home Quarantine मध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे.”

आपण सर्वांनी आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण करोना संसर्गाची साखळी तोडू शकू व करोनावर मात करू शकणार आहोत. तसेच, यामुळे आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत. असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने युरोपीतील देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकाडाउन जाहीर करण्यात आलेला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘Tarzan’ फेम Joe Lara चा विमान अपघातात मृत्यू

Web News Wala

११ महिन्यांत एकही रुग्ण नाही हे आहेत करोनामुक्त देश

Team webnewswala

गरमीवर मात करा सब्जा च्या सोबतीने

Web News Wala

Leave a Reply