Other क्राईम राष्ट्रीय सिनेमा

गॅंगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर येणार वेब सिरीज

मागील महिन्यात अत्यंत चर्चेत असलेल्या एका घटनेवर आता वेब सिरीज निघणार आहे. मूळच्या उत्तरप्रदेशातील पण उज्जैन येथे पोलिसांना शरण आल्यानंतर चकमकीत मारल्या गेलेल्या गँगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर लवकरच वेब सिरीज येणार आहे.

मागील महिन्यात अत्यंत चर्चेत असलेल्या एका घटनेवर आता वेब सिरीज निघणार आहे. मूळच्या उत्तरप्रदेशातील पण उज्जैन येथे पोलिसांना शरण आल्यानंतर चकमकीत मारल्या गेलेल्या गँगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर लवकरच वेब सिरीज येणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता या वेब सिरीजचं दिग्दर्शन करणार आहेत. निर्माता शैलेश आर. सिंग यांच्या कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंटने पोलॉरॉईड मीडियाच्या सहकार्यानं या वेब सिरीजचे हक्क विकत घेतले आहेत.

संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गँगस्टर विकास दुबेचं आयुष्य वेब सिरीजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आली होती.

hansal mehta to direct web series on gangster Vikas Dubey encounter

त्यानंतर त्याला कानपूरला घेऊन जात असतानाच पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विकास दुबेनं पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून गोळीबार केला. या चकमकीत विकास दुबे ठार झाला असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले होते.

विकास दुबेची उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांमध्ये उठबस होती अशीही चर्चा आहे.

विकास दुबेच्या आयुष्यावर निर्माता शैलेश आर. सिंग यांच्या कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंट पोलॉरॉईड मीडिया वेब सिरीज आणणार आहे. या वेब सिरीज दिग्दर्शन अलिगढ, ओमेर्ता, शहीद आदी चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता करणार आहेत.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

‘आपल्या काळातील आणि आपल्या व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे. जिथे राजकारण, गुन्हेगार आणि लोकप्रतिनिधी यांचे जिज्ञासू संबंध ठेवतात. दृष्टीकोनाबद्दल चर्चा करणं घाईचं होईल, पण जबाबदारीनं याकडे बघणार आहे. यात मला एक भडक राजकीय थ्रिलर दिसतो आहे. त्यामुळे ही कहाणी सांगणं रंजक असणार आहे’,

हंसल मेहता 

तर शैलेश सिंह या आगामी वेब सिरीजविषयी बोलताना म्हणाले, ‘मी ही घटना वृत्तसंस्था आणि इतर माध्यमातून जवळून पाहत आहे. आठ पोलिसांच्या हत्येमुळे देश हादरला आणि विकास दुबेला शोधण्यात आलं. सात दिवसांच्या शेवटानंतर त्याला चकमकीत ठार करण्यात आल्याचं मी पाहिलं.

त्यामुळे मला वाटलं की, ही कहाणी देशाला का सांगू नये. काही वास्तविक सत्य समोर का आणू नयेत. ही गोष्ट सांगण्यासाठी तिच्या खोलात का जाऊ नये. ही कहाणी सांगण्यासाठी उत्सुक आहे आणि त्या दृष्टीनं तिच्याकडे पाहत आहे’.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, पण मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

Web News Wala

परिणीती च्या ‘सायना’ चं पहिलं पोस्टर रिलीज

Team webnewswala

मुंबई CSMT पुनर्विकास साठी अदानीसह या 9 कंपन्या शर्यतीत

Web News Wala

1 comment

SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:44 pm

[…] गॅंगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर ये… […]

Reply

Leave a Reply