Team WebNewsWala
धर्म शहर समाजकारण

नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

कोरोना प्रादुर्भावामुळे नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा कसा साजरा करावा, याबाबत नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्यामध्ये यंदाचा उत्सव कसा साजरा करावा तसेच उत्सवाचे स्वरूप यासारख्या गोष्टी यात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा गरबा, दाांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता येणार
दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
मूर्तीचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी
देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करण्य संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पालघर-सफाळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था

Team webnewswala

सी लिंक आणि एक्सप्रेस वे वर १०० टक्के FastTag सुरू

Web News Wala

बारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल

Web News Wala

Leave a Reply