Team WebNewsWala
शहर शिक्षण

केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स

सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स नुसार मंत्रालयाशी सल्लामसलत करून कॉलेज आणि शिक्षण संस्था उघडण्यासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे.

केंद्र सरकारने बुधवार ३० सप्टेंबर रोजी अनलॉक – ५ (Unlock – 5) ची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स नुसार उच्च शिक्षण संस्थांनी मंत्रालयाशी सल्लामसलत करून कॉलेज आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उघडण्यासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. कोविड-१९ ची त्या-त्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात स्थिती कशी असेल त्यानुसार उच्च शिक्षण संस्था उघडण्याबाबत निर्णय घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे.

दुसरीकडे, ऑनलाइन शिक्षण मात्र सुरूच राहणार आहे, उलट त्याला अधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

दुसरीकडे, ऑनलाइन शिक्षण मात्र सुरूच राहणार आहे, उलट त्याला अधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

अनलॉक-५ च्या गाईडलाइन्सनुसार, केंद्रीय संस्थांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान शाखेच्या ज्या पदव्युत्तर विद्यार्थी आणि रिचर्स स्कॉलर्सना संशोधन कामासाठी प्रयोगशाळेची गरज आहे, त्यांना १५ ऑक्टोबरपासून संस्थेत येण्याची परवानगी द्यावी. मात्र, या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची खरंच किती आवश्यकता आहे, याबाबत संस्थाप्रमुखांनी चाचपणी करावी.
अन्य जे विज्ञान-तंत्रज्ञान शाखेचे राज्य सरकारी आणि खासगी विद्यापीठांचे विद्यार्थी आहेत, त्यांना विद्यापीठ वा कॉलेजमध्ये जाण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय संबंधित राज्य सरकारांनी घ्यावा, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

शाळांसाठीही मार्गदर्शक सूचना

दरम्यान, शाळांसाठीही केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य सरकारांना शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग संस्था टप्प्याटप्प्याने आणि परिस्थितीचं आकलन करून उघडण्याचा निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

१५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ते घेऊ शकतील. पण यासाठी सरकार शाळा किंवा शिक्षण संस्था व्यवस्थापनाशी सल्ला मसलत करतील आणि दिलेल्या अटींचे पालन करतील. ऑनलाइन शिक्षण किंवा दूरस्थ शिक्षण चालूच राहिल आणि सतत प्रोत्साहन दिले जाईल. ज्या शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत शारीरिक दृष्ट्या उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात

Team webnewswala

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी ग्रेस फाउंडेशन कडुन टॅब

Team webnewswala

मिठी नदीला आला पूर, महिलेसह तीन मुली गेल्या वाहून

Team webnewswala

Leave a Reply