Team WebNewsWala
Other शहर समाजकारण

MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना

MumUni School Of Thoughts

लोकशाहिर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त MumUni School Of Thoughts अकादमीच्या वतीने त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने अकादमीने अण्णा भाऊ साठे यांचे समाज, साहित्य आणि कला या क्षेत्रातील योगदान समजून घेण्यासाठी दि.१आँगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता दोन महत्वपूर्ण विषयांवर आँनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले.

त्यामध्ये प्रा.डॉ. रमेश लांडगे यांनी ‘अण्णा भाऊ साठे:एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व‘ व प्रा.डॉ. किशोर खिलारे यांनी ‘चित्रपटसृष्टीतील अण्णा भाऊ साठे’ ह्या विषयांवर व्याख्याने दिली.

‘अण्णा भाऊ साठे: एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ याविषयावरील आपल्या व्याख्यानात प्रा. डॉ. रमेश लांडगे यांनी अण्णा भाऊंच्या व्यक्तिमत्वामधील क्षमता, गुण, विचार, क्रुती आणि अभ्यास उलगडून दाखवला.अण्णा भाऊंचे व्यक्तिमत्त्व लोकशाहिर, साहित्यिक, काँम्रेड,व्यवस्थापक असे विविधांगी होते.ते कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावीत झालेले होते.

त्यामुळे ते निश्चितच पुरोगामी व सांप्रत दिशादर्शक ठरणारे आहे;असे मत व्यक्त केले. त्याच्या पुरावा म्हणजे अण्णा भाऊंनी तमाशाची सुरुवात गणेशवंदना नाकारून शिवाजी महाराजांना वंदन करणाऱ्या शिववंदनेने केली.अण्णा भाऊंच्या विचारात जरी साम्यवाद असला तरी ते नंतरच्या काळात आंबेडकरवादी विचारांकडे वळले होते.

नक्की वाचा >>  

MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

ग्रामीण परिसर,जात-व्यवहार-संबंध व माणूस यातील तणाबाणा, बहिष्कृत जाती व व्यवसायातील माणसांची संवेदनशीलता व नैतिकता हि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची केंद्रे आहेत. केवळ दिड दिवस शालेय शिक्षण घेतलेल्या अण्णा भाऊंची लावणी,पोवाडे, छक्कड यामधील सम्रुद्ध भाषावैशिष्ट्ये चकित करणारी आहेत कारण ती व्यापक अनुभवांनी आकारलेली आहे.

अण्णा भाऊंनी सुरु केलेले लोककला पथक व त्याद्वारे सादर केलेल्या विविध कार्यक्रमांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील व्यवस्थापकाचे प्रभावी दर्शन घडते. अण्णा भाऊंसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाला जातीमध्ये बंदिस्त करून संकुचित करु नये असे मत प्रा.डॉ. रमेश लांडगे यांनी व्यक्त केले.

संबंधित व्हिडिओ नक्की बघा >>  

‘चित्रपटस्रुष्टीतील अण्णा भाऊ साठे’ याविषयावरील व्याख्यानात प्रा.डॉ. किशोर खिलारे यांनी अण्णा भाऊंचे चित्रपट क्षेत्रातील योगदान व कलाद्रुष्टी विशद केली.इप्टामुळे अण्णा भाऊंचाअनेक प्रसिध्द चित्रपट कलावंताशी परिचय झाला. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांवर आधारित ‘फकीरा’,’वैजयंता’,’इभ्रत’ या चित्रपटांनी मराठी चित्रपटाला विषय व आशयसंपन्न केले व वास्तववादी बनविले. चित्रपटसृष्टीमध्ये अण्णा भाऊंनी कथालेखन, पटकथालेखन, संवादलेखन व निर्मिती अशा जबाबदाऱ्या सक्षमपणे स्वीकारून यशस्वीपणे पुर्ण केल्या.

अण्णा भाऊंच्या चित्रपटांद्वारे मराठी चित्रपटाला संवादाची अस्सल ग्रामीण भाषा व अभिनय, नायक व नायिका मिळाल्या. हे अण्णा भाऊ साठे यांच्या चित्रपटांचे यश आहे. जयश्री गडकर,चंद्रकांत, सुर्यकांत, निळु फुले यांसारखे प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे अभिनयसंपन्न कलावंत मराठी चित्रपटांना लाभले.अण्णा भाऊंनी रशियन चित्रपटातील तंत्र मराठी चित्रपटात येणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ए.के. अब्बास यांच्या चित्रपटाची अण्णा भाऊंनी केलेले समीक्षालेखन आजही चित्रपट समीक्षकांना मार्गदर्शक ठरणारे आहे, असे मत प्रा.डॉ. किशोर खिलारे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी केले. तंत्रज्ञान व जाहिरात यांची जबाबदारी मुमयुनी स्कूल आँफ थाँटस् अकादमीचे प्रशासक प्रशांत भालेराव व संदिप भांगरे यांनी यांनी यशस्वीपणे सांभाळली. प्रा.प्रज्ञाकिरण वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचाली

Team webnewswala

धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत

Team webnewswala

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

3 comments

Leave a Reply