Team WebNewsWala
पर्यावरण राष्ट्रीय

सरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय

केंद्र सरकारने इथेनॉलचा पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रणाचा निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून होणार आहे.

सरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय

Webnewswala Online Team – केंद्र सरकारने इथेनॉलचा पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रणाचा निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून होणार आहे.सरकारच्या राजपत्रात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाची यासंदर्भातील अधिसूचना दि. 2 जून 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे

तेल कंपन्यानी चालू वर्षी 500 कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले असून आजपर्यंत साखर कारखान्यांनी सुमारे 325 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. साखर कारखान्यांकडून ऑक्‍टोबरपर्यंत इथेनॉलची निर्मिती सुरू राहील.

केंद्र सरकारने 20 टक्के मिश्रणासाठी दीड वर्षाचा कालावधी हा नियोजनपूर्वक ठेवला आहे. प्रारंभी इथेनॉल मिश्रणास 2 टक्के मान्यता होती. नंतर 5 टक्के व पुढे 10 टक्के झाली. आता टप्प्याटप्प्याने सध्याचे इथेनॉलचे 10 टक्के मिश्रणाचे प्रमाण वाढविले जाऊन ते 1 एप्रिल 2023 रोजीपासून 20 टक्के केले जाईल.

सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल

त्यामुळे दर वर्षी 1000 कोटी लिटर इथेनॉलची तेल कंपन्यांकडून मागणी होईल. इथेनॉलला चांगले दर मिळत आहेत. याचा फायदा निश्‍चितपणे शेतकऱ्यांना होऊन पेट्रोलचे वाढते दरही आटोक्‍यात येण्यासही मदत होणार आहे. शिवाय देशाच्या परकीय चलनात बचत होण्यास मदत होईल.

देशात 5 कोटी, तर महाराष्ट्रात 40 लाख शेतकरी ऊसाचे पिक घेतात. साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 50 ते 60 हजार कोटींची झाली आहे. गेली 3 वर्षे अतिरिक्त उत्पादनामुळे साखर शिल्लक राहत आहे, त्यामुळे साखर उद्योग सध्या अडचणीत आला आहे.

120 लाख मे. टन साखर अतिरिक्त!

यंदा देशात 320 लाख मे. टन साखर उत्पादन झाले आहे. देशात घरगुती साखरेची 250 ते 255 लाख मे. टनाची मागणी राहणार आहे. त्यामुळे यंदा 50 ते 60 लाख मे.टन साखर अतिरिक्त होणार आहे.

महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात 65 व खासगीत 45 इथेनॉल प्रकल्प आहेत. आगामी काळात या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. त्यामुळे सुमारे एकूण 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत साखरेचे उत्पादन हे इथेनॉलकडे वळविले जाईल. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनाची अडचण दूर होण्यास मदत होईल.

Web Title – सरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय ( Government’s decision to mix 20 per cent ethanol in petrol )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

OTT चा चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का

Team webnewswala

नदीत टाकलं जाळं, ओढल्यानंतर दिसली मगर

Team webnewswala

रितेश विकतोय ‘शाकाहारी मटण’… काय आहे हे प्रकरण 

Team webnewswala

Leave a Reply