Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

लवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद

तुम्ही देखील गाणी ऐकण्यासाठी गुगलचे अ‍ॅप वापरत असाल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.गुगल लवकरच आपले हे म्यूझिक अ‍ॅप बंद करणार आहे.

जर तुम्ही देखील गाणी ऐकण्यासाठी गुगलचे म्यूझिक अ‍ॅप गुगल प्ले-म्यूझिक अ‍ॅप वापरत असाल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.गुगल लवकरच आपले हे म्यूझिक अ‍ॅप बंद करणार आहे.

Google's popular app will be discontinued

गुगलने या संदर्भात माहिती आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. गुगलने माहिती दिली की गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅपच्या सर्व युजर्सला यानंतर युट्यूब म्यूझिकवर शिफ्ट केले जाईल.

मागील काही महिन्यांपासून गुगल युट्यूब म्यूझिक अ‍ॅपसाठी नवनवीन फीचर जारी करत आहे.
नक्की वाचा >>  
Youtube hacking चा फटका कॅरी मिनाटी ला 
चीनला आणखी एक दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

Google's popular app will be discontinued

युट्यूब म्यूझिक अ‍ॅपवर शिफ्ट झाल्यानंतर याच ठिकाणी युजर्सला गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅपची प्लेलिस्ट, लायब्रेरी आणि म्यूझिक मिळेल. गुगल प्ले- म्यूझिकला ऑक्टोंबर 2020 नंतर कोणतेही अपडेट मिळणार नाही. तर डिसेंबर 2020 पर्यंत युजर्सला युट्यूब म्यूझिक अ‍ॅपवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया पुर्ण होईल.

नक्की वाचा >>  
आपले संगीत कॅटलॉग Google Play वरून YouTube संगीत वर कसे हस्तांतरित करावे

सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे युजर्स या अ‍ॅपचा वापर करू शकणार नाहीत. तर ऑक्टोंबरपासून जगभरात हे अ‍ॅप बंद होईल. गुगल युट्यूब म्यूझिकवर नवनवीन फीचर देऊन युजर्सला आकर्षित करत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

Team webnewswala

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Team webnewswala

कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द

Team webnewswala

Leave a Reply