Team WebNewsWala
अर्थकारण तंत्रज्ञान राष्ट्रीय व्यापार

गुगल पे येणार नव्या स्वरूपात

‘गुगल पे’ द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून शुल्क आकारलं जाईल, असं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं.

गुगलने क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करण्याचा इशारा दिलेला असताना आता आणखी एक पेमेंट अॅप गुगल पे (Google Pay) बुचकळ्यात टाकणार आहे. गुगल पे चा सुरुवातीपासूनचा लोगो बदलला जाणार आहे. यामुळे फसायला होण्याची चिन्हे आहेत. कारण त्यावर आता जी हे अक्षरच नसणार असून यु आणि एन चा मिलाप असणार आहे.

गुगल पे भारतीय युजरसाठी नवीन लोगो दिवाळीपूर्वी जारी करण्याची शक्यता 

नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार असून गुगल पे चे फायनल व्हर्जनही लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. 9to5Google वेबसाईटच्या रिपोर्टनुसार गुगल पेच्या नवीन लोगोमध्ये U आणि N इंटरलॉक केला आहे. हा लोगो 3D वाटतो. वेगवेगळी रंगसंगती यामध्ये वापरण्यात आली आहे. या नव्या लोगोत लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे.

गुगलने क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करण्याचा इशारा दिलेला असताना आता आणखी एक पेमेंट अॅप गुगल पे चा सुरुवातीपासूनचा लोगो बदलला जाणार आहे.

Google Pay हे अ‍ॅप भारतात तेझ या नावाने 18 सप्टेंबर 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने नाव बदलून ते Google Pay केले होते. यामुळे आधी एवढे लोकप्रिय न झालेले अ‍ॅप हळूहळू भारतीयांच्या मोबाईलमध्ये दिसू लागले. गुगलचा जी आणि पे अशी अक्षरे असलेला लोगो आहे. यामुळे सध्यातरी हे अ‍ॅप सहज ओळखता येते. मोबाईलमध्ये भारंभार अ‍ॅप इन्स्टॉल असतात. त्यातून नेमके गुगल पे अ‍ॅप शोधून काढणे सध्यातरी सोपे आहे. परंतू आता नवीन लोगो आल्यास मात्र, फसायला होण्याची मोठी शक्यता आहे. कारण यावर कुठेही गुगलचा जी किंवा पे लिहिलेले नाही.

Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट अ‍ॅप बनले आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वरही काही लोकांनी google pay चा नवा लोगो ट्विट केला आहे. अद्याप कंपनीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यापूर्वीही google ने आपल्या अनेक ऍपच्या लोगोमध्ये बदल केले होते.

मात्र सोशल मीडियावर, या लोगो किंवा आयकॉनमध्ये बदल केल्याने कन्फ्युजन होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

असा असेल नवीन लोगो….

गुगलने क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करण्याचा इशारा दिलेला असताना आता आणखी एक पेमेंट अॅप गुगल पे चा सुरुवातीपासूनचा लोगो बदलला जाणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

WhatsApp सेंड करण्याआधी ऐका Voice Massage

Web News Wala

नक्की काय आहे शिवनागम मुळी म्हणुन पहिला जाणारा व्हिडिओ

Team webnewswala

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी

Web News Wala

Leave a Reply