आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

Go SMS Pro हे अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवलंय.

Go SMS Pro हे लोकप्रिय अँड्रॉइड मेसेजिंग अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन हटवलंय. आतापर्यंत 100 मिलियनपेक्षा जास्त वेळेस हे अ‍ॅप डाउनलोड झालं आहे.

Go SMS Pro हे लोकप्रिय अँड्रॉइड मेसेजिंग अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन हटवलंय. आतापर्यंत 100 मिलियनपेक्षा जास्त वेळेस हे अ‍ॅप डाउनलोड झालं आहे. या अ‍ॅपमध्ये सुरक्षेच्याबाबतीत काही गंभीर उणिवा असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर प्ले स्टोअरने हे अ‍ॅप हटवलं आहे.

अ‍ॅपमध्ये सुरक्षेच्याबाबतीत काही गंभीर उणिवा

मिळालेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपमध्ये युजर्सकडून पाठवण्यात आलेले फोटो, व्हिडिओ आणि अन्य फाइल्सला हॅकर्सकडून सहज अ‍ॅक्सेस करणं शक्य होत होतं. हे अ‍ॅप मेसेजिंगदरम्यान एक लिंक तयार करत होतं, त्याच लिंकद्वारे हॅकर युजरच्या फोनचा अ‍ॅक्सेस मिळवायचे. तर, युजर्सना मात्र या लिंकबाबत काहीही माहिती नव्हती. GO SMS Pro (7.91 व्हर्जन) मधील उणिवेबाबत सर्वप्रथम Trustwave ने माहिती दिली होती.

या अ‍ॅपद्वारे हॅकर्स सहजपणे युजरच्या खासगी मेसेज, फोटो आणि व्हिडिओपर्यंत पोहोचू शकतात असं ट्रस्टवेवने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

TechCrunch च्या एका रिपोर्टनुसार, या अ‍ॅपमध्ये उणीव दिसल्यानंतर समस्या दूर करण्यासाठी Go SMS Pro च्या डेव्हलपर्सना 90 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. पण त्यानंतरही कंपनीने उणीव दूर केली नाही.

हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर डाउनलोडिंगसाठी उपलब्ध नाही

दरम्यान, अ‍ॅपमधील या बगमुळे किती युजर्सचा खासगी डेटा लीक झालाय याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, आता हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे, त्यामुळे डाउनलोडिंगसाठी ते आता उपलब्ध नाही.

पण, ज्यांच्या फोनमध्ये अ‍ॅप आधीपासून इंस्टॉल असेल तिथेच हे अ‍ॅप आता उपलब्ध आहे. जर तुमच्याही फोनमध्ये हे अ‍ॅप असेल तर सर्वप्रथम अ‍ॅपचं स्टोरेज डिलिट करा आणि नंतर अ‍ॅपही डिलिट करा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

1 जानेवारी पासुन बदलणार मोबाईल डायल करण्याचे नियम

Web News Wala

Google, Amazon ला 16 कोटी डॉलर्सचा दंड

Team webnewswala

IPL 2021 पूर्ण करण्यास BCCI ची कसरत, वेळापत्रकात बदल

Web News Wala

Leave a Reply