Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

True Caller ला टक्कर देणार गुगल आणले भन्नाट फीचर

True Caller ला टक्कर देण्यासाठी गुगलने आपल्या युजर्ससाठी एक आणले भन्नाट फीचर अँड्राईड कॉल्स केले लाँच. कंपनीने भारतासह 5 देशांमध्ये हे फीचर रोल आउट केलेे.

सध्या प्रामुख्याने फोनमध्ये येणाऱ्या स्पॅम कॉल्सची किंवा अनोळखी नंबरची माहिती जाणून घेण्यासाठी True Caller या अ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र आता True Caller ला टक्कर देण्यासाठी सर्च इंजिन गुगलने आपल्या युजर्ससाठी एक आणले भन्नाट फीचर अँड्राईड कॉल्स लाँच केले आहे. कंपनीने भारतासह 5 देशांमध्ये सध्या हे फीचर रोल आउट केले आहे.
गुगलच्या या फीचरमुळे युजर्सला स्पॅक कॉलची माहिती मिळते. हे फीचर्स युजर्सला कोण कॉल करत आहे, कॉल करण्याचे कारण काय आहे आणि कॉलरचा लोगो देखील दिसेल. फ्रॉड कॉलवर लगाम घालण्यासाठी प्रामुख्याने हे फीचर आणण्यात आले आहे.

हे फीचर भारत, स्पेन, ब्राझील, मॅक्सिको आणि अमेरिकेत रोलआउट करण्यात आलेले आहे.

याशिवाय बिझनेसचा व्हेरिफाइड बॅच देखील गुगलकडून व्हेरिफाय केलेल्या नंबरवर दिसेल. गुगलचे हे फीचर त्यांना बिझनेस कॉल करण्यामागचे कारण काय आहे, हे देखील सांगेल. ट्रूकॉलरमध्ये अद्याप हे फीचर देण्यात आलेले नाही.
गुगल फोन अ‍ॅपमध्ये हे फीचर आल्याने युजर्सला याचा मोठा फायदा होईल. हे फीचर एकप्रकारे ट्रूकॉलरप्रमाणेच काम करते. त्यामुळे हे फीचर मोबाईलमध्ये आल्यावर थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. अँड्राईड फोनमध्ये गुगल फोन अ‍ॅप डिफॉल्ट डायलरचे काम करत असते. पुढील अपडेटमध्ये हे नवीन फीचर युजर्सला मिळेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

इंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज

Team webnewswala

चिनी स्मार्टफोनला भारतीय Lava ची टक्कर

Team webnewswala

जगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार

Team webnewswala

Leave a Reply