Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान समाजकारण

Google, Amazon ला 16 कोटी डॉलर्सचा दंड

फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं Google आणि Amazon ला तब्बल १६.३ कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.

फ्रान्स : फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं Google आणि Amazon ला तब्बल 16 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फेन्च वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. ते जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या आपण कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या होत्या, असं CNIL नं सांगितलं.

गुगल आणि अॅमेझॉन आपल्या युझर्सना या कुकीजच्या उद्देशाबाद्दल कसं नाकारू शकतात. तसंच याबद्दल कोणतीही माहिती देण्यास ते असमर्थ ठरले आहेत. दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या वेबसाईट्स मध्ये बदल केले होते. परंतु ते बदल फ्रान्सच्या नियमांप्रमाणे योग्य नव्हते, असंही CNIL नं म्हटलं आहे.

का लागला ? Google Amazon ला 16 कोटी डॉलर्सचा दंड

गुगलच्या प्रकरणात त्यांनी कुकीजद्वारे एकत्र केलेल्या डेटाटून जाहिरातीद्वारे कमवलेल्या उत्पन्नातून नफा मिळवला. याचा परिणाम तब्बल ५० दशलक्ष युझर्सवरही झाला, असंही कंपनीनं सांगितलं. त्यांना ठोठावण्यात आलेला दंड हा त्यांच्या नियमांच्या उल्लंघनाच्या तुलनेत योग्य असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. संबंधित संस्थेनं गुगल आणि अॅमेझॉनला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामध्ये त्यांना आपली पद्धत बदलावी लादणार आहे. यामध्ये त्यांना ग्रांहकांना त्यांच्या डेटाचा वापर कसा कला जातो आणि कुकीजना ते कसं नाकारू शकतात हेदेखील त्यांना सांगावं लागणार आहे. असं न केल्यास त्यांना दररोज १ लाख युरोचा (१ लाख २१ हजार ०९५ डॉलर्स) दंड भरावा लागणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू

Web News Wala

राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेच्या अध्यक्षपदी योगेश महाजन

Web News Wala

1 जानेवारी पासुन बदलणार मोबाईल डायल करण्याचे नियम

Web News Wala

Leave a Reply