आंतरराष्ट्रीय आरोग्य

Good News : जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

कोरोना व्हायरस संकट आणि व्हॅक्सीनच्या टंचाईच्या दरम्यान एक दिलासा देणारी बातमी आहे की, फायजरची लस (Pfizer vaccine) सुद्धा जुलैपासून भारताला मिळू शकते.

Good News : जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

Webnewswala Online Team – कोरोना व्हायरस संकट आणि व्हॅक्सीनच्या टंचाईच्या दरम्यान एक दिलासा देणारी बातमी आहे की, फायजरची लस (Pfizer vaccine) सुद्धा जुलैपासून भारताला मिळू शकते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, फायजरशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी संकेत दिले आहेत की, ते भारतासाठी लस उपलब्ध करून देतील. यामुळे त्या वृत्ताला बळ मिळाले आहे, ज्यामध्ये म्हटले होते की, फायजरने जुलैपासून ऑक्टोबरच्या दरम्यान पाच कोटी डोस भारताला देण्यात येतील.

जुलैपासून ऑक्टोबरच्या दरम्यान भारताला पाच कोटी डोस

व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, फायजरसोबतच चर्चा सुरू आहे. त्यांनी म्हटले की, फायजरने लसीच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत मागणी केली केली आहे, ज्यावर भारत सरकार विचार करत आहे आणि लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारची सूट फायजरने अमेरिकेसह त्या सर्व देशांमध्ये केली होती, जिथे लस पुरवली आहे.

कोरोना लसीकरण कार्यक्रमात सहभागी होणारी ही चौथी लस

पॉल यांनी म्हटले की, या मुद्द्यांवर मार्ग निघाल्यानंतर फायजरकडून जुलैपासून लसीचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. जर फायजरची लस भारताला मिळाली तर कोरोना लसीकरण कार्यक्रमात सहभागी होणारी ही चौथी लस असेल. आता कोव्हॅक्सीन, कोविशील्ड तसचे स्पूतनिक लसीचा वापर केला जात आहे. देशात लसीची उपलब्धता कमी असल्याने रोज 15-20 लाख डोसच दिले जात आहेत. यापूर्वी हा आकडा 30 लाखाच्या वर होता.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन कंपनी फायजरने म्हटले होते की, ते 2021 मध्येच पाच कोटी डोस तयार करण्यासाठी तयार असतील, पण त्यांना नुसानीसह काही नियम आणि अटींमध्ये मोठी सूट हवी आहे. या अमेरिकन कंपनीने पाच कोटी डोस याच वर्षी उपलब्ध करण्याचा संकेत दिला आहे. यामध्ये एक कोटी डोस जुलैमध्ये, एक कोटी ऑगस्टमध्ये आणि दोन कोटी सप्टेंबरमध्ये उपलब्ध केले जातील. कंपनी केवळ भारत सरकारशी चर्चा करेल आणि लसीचे पैसे भारत सरकारद्वारे फायजर इंडियाला द्यावे लागतील.

Web Title – Good News : जुलैपासून मिळू शकते फायजरची लस ( Good News: Pfizer vaccine is available from July )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज

Web News Wala

लगेच अपडेट करा Google Chrome, Cert-In ने दिला इशारा

Web News Wala

नैराश्यावर मात करा एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

Team webnewswala

Leave a Reply