Team WebNewsWala
Other नोकरी शहर

पश्चिम रेल्वेकडून महिलांसाठी आनंदाची बातमी

कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईची रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेकडून महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफ लाईन असलेली रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायत. रोडवरील ट्रॅफीक आणि बसच्या धक्काबुक्कीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. त्यामुळे ट्रेन लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरातून होतेय. दरम्यान पश्चिम रेल्वेकडून महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

लेडीज स्पेशल ट्रेन पुन्हा सुरु होणार

पश्चिम रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत लेडीज स्पेशल ट्रेन धावणार आहे. विरारहून चर्चगेटसाठी सकाळी ७.३५ ची तर चर्चगेटहुन विरारसाठी संध्याकाळी ६.१० ची लेडीज स्पेशल ट्रेन धावणार आहे. या निर्णयामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकलच्या फेऱ्यांमध्ये सोमवार पासून होणार वाढ 

पश्चिम रेल्वेवर सहा लोकलच्या फेऱ्यांमध्ये सोमवार पासून वाढ होणार आहे.  ज्यात दोन फेऱ्या या लेडीज स्पेशल असणार आहेत. सध्या ५०० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. त्या वाढून आता ५०६ फेऱ्या होणार आहेत.

अत्यावश्यक सेवेतील आणि राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने सध्या प्रवास करता येतोय.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

तब्बल 1 कोटी शिवलिंग असणारे मंदिर तुम्ही पाहिलंत का

Web News Wala

११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, पण ‘सर्व्हर डाउन’

Team webnewswala

पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

Team webnewswala

Leave a Reply