अर्थकारण राष्ट्रीय समाजकारण

मोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन

गौतम अदानी, मुकेश अंबानी यासारख्या उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे.यामुळे केवळ उद्योगपतीच श्रीमंत होत असल्याची टीका.
मोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन

मुंबई – विविध आर्थिक संस्थांच्या अहवालांमध्ये गौतम अदानी, मुकेश अंबानी यासारख्या उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे.यामुळे केवळ उद्योगपतीच श्रीमंत होत असल्याची टीका करणाºयांच्या डोळ्यात हुरून इंडियाच्या अहवालाने अंजन घातले आहे.

लॉकडाऊन असतानाही देशात ४.१२ लाख नवीन कोट्यधीश

हुरुन इंडियाच्या वेल्थ रिपोर्ट २०२० नुसार, कोरोनाची साथ आणि त्यामुळे केलेला लॉकडाऊन असतानाही देशात ४.१२ लाख नवीन कोट्यधीश आणि ६.३३ लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली आहेत. नव्या कोट्यधीशांमध्ये ३००० कुटुंबे अशी होती, ज्यांची नेटवर्थ १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

ते सुपर रिचच्या श्रेणीत समाविष्ट झाले. नवीन मध्यमवर्गीय कुटुंबांकडे आपले घर आणि महाग वाहनेही होती. सामान्य मध्यमवगीर्यांची संख्या ५.६४ कोटी आहे. त्यांची वार्षिक कमाई अडीच लाख रुपये आहे. १६,९३३ कोट्यधीशांसह मुंबई सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.

कोरोनाच्या साथीनंतर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे अर्थव्यवस्थेवर मंदीचे मळभ आले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. लघुउद्योगांना सवलती दिल्या.

आत्मनिर्भर भारत योजनेचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम

आत्मनिर्भर भारत योजनेचा नारा देत भारतीय कंपन्यांना अनेक वस्तूंच्या उत्पादनात प्राधान्य दिले. त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळेच मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांची संख्या वाढली आहे.

देशातील ६.३३ लाख कुटुंबांनी गरीबीची रेषा पार करून मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. तर सव्वा चार लाख नवे कोट्याधिश बनले आहेत.

मुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे

मुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे आहेत, त्यांचा देशाच्या जीडीपीत ६.१६ टक्के वाटा आहे. १६ हजार कोट्यधीशांसह नवी दिल्ली दुसºया आणि कोलकाता १० हजार कोट्यधीशांसह तिसºया स्थानी आहे. ५६ हजार श्रीमंतांसह महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे.

हुरून इंडियाच्या रिपोर्टनुसार २०१९ च्या तुलनेत ७२ टक्के लोक आता व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनातही खुश आहेत. त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन ठरले. परदेश प्रवासासाठी स्वित्झर्लंड, अमेरिकेनंतर ब्रिटनला पसंती मिळाली. गुंतवणुकीसाठी सिंगापूर आणि यूएईनंतर अमेरिकेलाच सर्वांची पसंती होती. विदेशात शिक्षणाबाबतही अमेरिकेला सर्वांची पसंती आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मराठी भाषादिनी रंगला ठाण्यात Udyam Thane – उद्यम ठाणे परिवाराचा अनोखा सोहळा

Web News Wala

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

महावितरण कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा

Web News Wala

Leave a Reply