Team WebNewsWala
Other शहर

पुण्यात म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी

पुण्यात म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी. पुणे विभागात पाच हजार ६४७ सदनिकांसाठी म्हाडाच्या वतीने सोडत काढण्यात आली आहे.
पुणे : पुण्यात म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी. पुणे विभागात पाच हजार ६४७ सदनिकांसाठी म्हाडाच्या वतीने सोडत काढण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.

१० डिसेंबर ते ११ जानेवारी रोजी सायंकाळी पाचवाजेपर्यंत म्हाडाचे घर अर्ज नोंदणी करता येईल. तर १२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

सदनिका किती ?

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्य़ात म्हाळुंगे-चाकण (५१४), तळेगाव दाभाडे (२९६), सोलापूर जिल्ह्य़ात गट नं. २३८/१ (२३९), करमाळा (७७) तर सांगली येथे स.क्र.२१५/३ येथे ७४ अशा एकूण ९६१ सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. म्हाडाअंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी (८७), पिंपरी वाघेरे (९९२) अशा १०७९ सदनिका आहेत. तसेच सांगली  येथे १२९ सदनिका आहेत.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत पुणे जिल्हयात म्हाळुंगे येथे १८८०, दिवे येथे १४ तर सासवड येथे ४ सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्य़ात ८२ सदनिका आहेत, अशा एकूण १९८० सदनिका आहेत. २० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे ४१०, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे १०२० तर कोल्हापूर महानगरपालिका येथे ६८ अशा एकूण १४९८ सदनिका आहेत. या सर्व सदनिका  अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यतील राधानगरी येथील ६८ भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मराठीतला पहिला ‘झॉम-कॉम’ सिनेमा ‘झोंबिवली’

Team webnewswala

हनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर

Web News Wala

लोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट

Web News Wala

Leave a Reply