Team WebNewsWala
इतर राष्ट्रीय

Gold-Silver Price Today सलग तिसऱ्या दिवशी घसरण

Gold fell for the third day in a row

Gold-Silver Price Today सलग तिसऱ्या दिवशी घसरण

Webnewswala Online Team – सोनं आणि चांदीच्या (Gold-Silver) किमतींमध्ये (Gold-Silver Price Today) सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारांमध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घट झाली आहे. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा वायदा 0.10% टक्क्यांनी घसरुन 48,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर, चांदी 0.21% टक्क्याच्या घसऱणीनंतर 70,663 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. या घसरणीनंतर दोन दिवसातच सोनं 1,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

मागील सत्रात भारतात सोन्याच्या दरात 2 टक्के म्हणजेच 950 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण

तर, चांदी 2.5 टक्क्यांनी म्हणजेच 1,800 रुपयांनी घटली आहे. जागतिक बाजारात अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या घसरणीनंतर सोन्याचे दर दोन आठवड्याच्या निच्चांकावर गेले आहेत. मागील सत्रात झालेल्या दोन टक्के घसरणीनंतर सोन्याच्या हजर बाजारातील किमती 0.4 टक्क्यांनी घसरुन 1,862.68 डॉलरवर आल्या आहेत.

आज सोन्याच्या किमतीत 0.10 टक्क्यांची घसरण आली. यानंतर दहा ग्रॅम सोन्याचे भाव 48,627 रुपयांवऱ आले आहेत. तर, चांदीच्या किमतीत 0.21टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यानंतर MCX वर चांदीच्या किमती 70,663 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहेत.

आजही तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम 2021-22 च्या तिसऱ्या सीरिजच्या माध्यमातून स्वस्तात सोनं खरेदी करू शकता. ही स्किम 31 मे रोजी सुरू झाली होती आणि सलग पाच दिवस सुरू असेल. रिझर्व बँक ऑफ इंडियानं गोल्ड बॉन्ड स्किमच्या तिसऱ्या सीरिजसाठी इश्यू प्राइस 4,889 रुपये प्रति ग्रॅम इतकी निश्चित केली आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी तुम्हाला 48,890 रुपये मोजावे लागतील.

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास सरकारकडून तयार कऱण्यात आलेल्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही ती तपासू शकता. ‘BIS Care app’ असं या अॅपचं नाव आहे. यात आपण शुद्धता चेक करण्यासोबतच यासंबंधीच्या तक्रारीही करू शकता.

Web Title – Gold-Silver Price Today सलग तिसऱ्या दिवशी घसरण ( Gold fell for the third day in a row )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

रोशनी नाडर ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला

Team webnewswala

Corona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार

Web News Wala

Mera Ration app घरबसल्या बघा तुमच्या रेशनकार्ड किती धान्य मिळणार

Web News Wala

Leave a Reply