Team WebNewsWala
इतर पोटोबा व्यापार शहर

गोकुळ दुधाचे Tetra Pack बाजारात दाखल

दूध उद्योगात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या 'गोकुळ'ने दुधाचे टेट्रा पॅक (Tetra Pack Milk) बाजारात दाखल केले. दूध पॅक ओपन केले नसल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते

दूध उद्योगात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ‘गोकुळ’ने (Gokul) दुधाचे टेट्रा पॅक (Tetra Pack Milk) बाजारात दाखल केले. टेट्रा पॅकमधील दूध पॅक ओपन केले नसल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते, असे कंपनीने सांगितले. (Gokul Tetra Pack Milk)

  • गोकुळ हा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा ब्रँड

प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून दुधाची विक्री करणाऱ्या ‘गोकुळ’ने Tetra Pack स्वरुपातही दुधाचा मर्यादीत साठा विक्रीसाठी नियमितपणे बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी ‘गोकुळ सिलेक्ट‘ (Gokul Select, an ultra high temperature treated milk) या नावाचे एक लिटरचे टेट्रा पॅक घेऊन आली आहे. हे दूध ६४ रुपये लिटर दराने उपलब्ध आहे.

बाजारपेठेतील २० टक्के हिस्सा काबीज करण्यासाठी प्रयत्न

मुंबईमध्ये सध्या दररोज पाच लाख लिटर टेट्रा पॅक दूध खपते. या बाजारपेठेतील किमान २० टक्के हिस्सा दोन वर्षात काबीज करण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दुधाचे टेट्रा पॅक ‘गोकुळ’ने विक्रीसाठी बाजारात आणले असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीतचे (Kolhapur Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh Ltd.) अध्यक्ष रवींद्र आपटे (Ravindra Pandurang Apte, Chairman) यांनी दिली.

मुंबईत अनेकजण शिफ्ट ड्युटी करतात. अशा मंडळींना ताजे दूध खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्यापेक्षा घरात टेट्रा पॅक आणून सोयीनुसार वापरणे पसंत आहे. तसेच मुंबईत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने एकटे राहणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. या मंडळींसाठीही टेट्रा पॅकमधील दूध सोयीचे आहे. याच बाबींचा विचार करुन ‘गोकुळ’ने मुंबईतील ग्राहकांसाठी पिशवीतले दूध आणि टेट्रा पॅकमधील दूध असे पर्याय उपलब्ध केले आहेत.

टेट्रा पॅकमधील दूध सहा महिने टिकू शकते

‘गोकुळ सिलेक्ट’ या टेट्रा पॅकमधील दूध बंदीस्त स्वरुपात मुंबईच्या सामान्य तापमानातही सहा महिने टिकू शकते. कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात मुंबईत टेट्रा पॅक दुधाची मागणी वाढली. नंतर ही मागणी स्थिरावली तरी कायम आहे. ज्यांनी आधी टेट्रा पॅकचे दूध वापरले नव्हते अशा अनेकांनी सोयीसाठी म्हणून टेट्रा पॅक दुधाला पसंती द्यायला सुरुवात केली आहे. याच कारणामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ‘गोकुळ सिलेक्ट’ हे टेट्रा पॅकमधील दूध मुंबईच्या बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. टेट्रा पॅकमधील दूध ऑनलाइन पद्धतीनेही खरेदी करता येईल.

हे ही वाचा
  • गोकुळ दुधाचे टेट्रा पॅक बाजारात दाखल
  • ‘गोकुळ सिलेक्ट’ एक लिटरचे टेट्रा पॅक ६४ रुपयांत उपलब्ध
  • पॅक ओपन केले नसल्यास दूध सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते

दुधाचे शुद्धीकरण करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची कोल्हापूर जिल्ह्यात स्वतःची यंत्रणा (dairy plant) आहे. या यंत्रणेमार्फत दररोज १५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. कंपनीचे स्वतःच्या मालकीचे चार चिलिंग सेंटर आहेत. या सेंटरमध्ये दूध आणि दुधापासून तयार केलेली उत्पादने अती थंड तापमानात साठवली जातात. विक्री करण्यासाठी दूध आणि दुधापासून तयार केलेल्या उत्पादनांचे पॅकिंग करण्याची व्यवस्थाही चिलिंग सेंटरमध्ये (chilling centre) आहे. चार पैकी एक चिलिंग सेंटर नवी मुंबई येथे आहे.

याच सेंटरमधून दररोज मुंबईत दूध पुरवठा होतो. नवी मुंबईच्या चिलिंग सेंटरची क्षमता साडेसहा लाख लिटर एवढी आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न

Web News Wala

कशेळी ब्रिज जवळ कंटेनर थेट पुलावरून कोसळला खाडीमध्ये

Team webnewswala

MIDC चा Server hack हॅकर ची 500 कोटींची मागणी

Web News Wala

Leave a Reply