आंतरराष्ट्रीय शिक्षण समाजकारण

सोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.

जगभरातील १२ हजार शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता

जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून रणजीतसिंह डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नव्हेत तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे विविध नऊ देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’ करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त; भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी

Web News Wala

आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन

Web News Wala

Leave a Reply