Team WebNewsWala
Other व्यापार

जागतिक गुंतवणुकदार Reliance industries च्या प्रेमात

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत श्रीमंत माणूस आहेत. अंबानी कुटुंब आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत माणसापेक्षा दुप्पट श्रीमंत आहेत.

Jio प्लॅटफॉर्मनंतर (Silver Lake Partners) एसएलपीची रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक
जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platform) मध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता जगभरातील सर्वात मोठी टेक गुंतवणूकदार कंपनी असणारी एसएलपी (Silver Lake Partners) आता रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) गुंतवणूक करत असल्याने जागतिक गुंतवणुकदार Reliance industries च्या प्रेमात असल्याचे दिसुन येत आहे

मुंबई जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platform) मध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता जगभरातील सर्वात मोठी टेक गुंतवणूकदार कंपनी असणारी एसएलपी (Silver Lake Partners) आता रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) गुंतवणूक करत आहे. यातून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की रियालन्स रिटेल भारतीय किरकोळ बाजारात तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलाव घडवून आणण्याासठी पुढाकार घेत आहे.

खाजगी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक पार्टनर्स रिलायन्स समुहाच्या (RIL) रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करत आहेत. एसएलपीने या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलमधील 1.75 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. याआधी सिल्ह्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.08 टक्के भागीदारी खरेदी केली होती.

रिलायन्स समुहाची सब्सिडिअरी कंपनी असणारी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड फ्यूचर ग्रृपमधील रिटेल अँड होलसेल बिझनेस, लॉजिस्टिक तसंच वेअर हाउसिंग बिझनेसचे संपादन करत आहे. यामुळे रिलायन्सची पोहोच फ्यूचर ग्रृपच्या बिग बझार, ईझीडे आणि एफबीबीच्या 1800 हून अधिक स्टोअर्सपर्यंत जाईल. हे स्टोअर्स देशभरात 420 हून अधिक शहरात आहेत. 24713 कोटींमध्ये हा करार करण्यात आला आहे.

रिलायन्स रिटेलचा एसएलपीबरोबर करार

जगभरातील सर्वात मोठी टेक गुंतवणूकदार कंपनी Silver Lake Partners रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करत आहे. याकरता रिलायन्स रिटेलचे मुल्यांकन 4.21 लाख कोटी आहे. सिल्ह्वर लेकची रिलायन्स समुहातील ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. याआधी त्यांनी 2020 च्या सुरुवातीला जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 10,202.55 कोटींची गुंतवणूक केली आहे.

जगभरातील दिग्गज कंपनींमध्ये गुंतवणूक करण्याचा एसएलपीचा रेकॉर्ड आहे. एसएलपीने आतापर्यंत ट्विटर, Airbnb, अलीबाबा, डेल टेक्नॉलॉजिज, ANT Financials, अल्फाबेट, Waymo यांसारख्या अनेक बड्या टेक कंपन्यांमध्ये एसएलपीची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक म्हणजे आरआयएलच्या तंत्रज्ञान आणि ग्राहक व्यवसाय क्षमतेचे, व्यवसाय मॉडेलचे आणि दीर्घकालीन वाढीच्या संभाव्यतेचे मोठे समर्थन आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका

Web News Wala

Mumuni School of Thoughts तर्फे ‘अर्थ’ पूर्ण व्याख्यानाचे आयोजन

Team webnewswala

स्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष

Team webnewswala

Leave a Reply