Team WebNewsWala
Other राष्ट्रीय शहर समाजकारण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं लिहिलं रक्तानं पत्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नने सन्मानित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी एका शिवसैनिकानं चक्क रक्तानं पत्र लिहिलं
सोलापूर– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नने सन्मानित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी एका शिवसैनिकानं चक्क रक्तानं पत्र लिहिलं आहे. बार्शीतील राजेंद्र गायकवाड असे शिवसैनिकाचं नाव आहे.

Anna bhau sathe

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिलं आहे. त्याचबरोबर त्यांचे साहित्यातील योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे. त्यामुळे साहित्य सम्राटअण्णा भाऊसाठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा यासाठी केंद्राकडे आपण मागणी करण्याची विनंतीही राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता एक ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या व्यथा, वेदना त्यांच्या साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या आणि समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले.

विविध समाजघटकांकडून या मागणीबाबत जोर धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे.

बहुजन लोक अभियान या संघटनेनंही विनंती

दरम्यान, आमदार कुल यांच्यासोबतच बहुजन लोक अभियान या संघटनेनंही अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ‘अण्णाभाऊंनी बारा बलुतेदार आणि बहुजन समाजासह देशातील विविध घटकांसाठी काम केलेलं आहे. यापूर्वीच शासनानं त्यांच्या कामाची दखल घ्यायला हवी होती.

आता विविध आमदार आणि खासदार याबाबत पत्र लिहून मागणी करत आहेत. त्यामुळे शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं,’ अशी मागणी बहुजन लोकअभियान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आबा वाघमारे यांनी केली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स

Team webnewswala

चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक

Team webnewswala

नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs

Team webnewswala

6 comments

डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात - Web News Wala July 27, 2020 at 4:56 pm

[…] लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द… […]

Reply
मुमयुनी स्कूल आँफ थाँटस् - समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न - Web News Wala July 28, 2020 at 5:30 pm

[…] लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द… […]

Reply
कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन - Web News Wala August 2, 2020 at 9:33 pm

[…] लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द…  […]

Reply
कशेळी ब्रिजजवळ थेट पुलावरून कंटेनर कोसळला खाडीमध्ये - Web News Wala August 3, 2020 at 10:57 pm

[…] लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द… […]

Reply
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या धनगर प्रतिष्ठानची मागणी - Web News Wala August 14, 2020 at 2:42 pm

[…] लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द…  […]

Reply

Leave a Reply