अर्थकारण राष्ट्रीय

1 जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल

1 जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये फोन पे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे यांसारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपच्या माध्यमातून जर UPI ट्रान्झॅक्शन करण्यात आले तर त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याची तरतूद करण्याचा विचार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) करत आहे.

मागील काही वर्षांमध्ये ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. खासकरून, यूपीआय (UPI Payments) व्यवहारांची संख्या वाढली आहे. अनेक अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. मात्र आता या अ‍ॅप्सवर मर्यादा येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) 1 जानेवारी 2021 पासून थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडरद्वारे संचालित यूपीआय पेमेंट सेवेवर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. (NPCI caps UPI transactions on third-party apps at 30%)

1 जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये फोन पे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे यांसारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपच्या माध्यमातून जर UPI ट्रान्झॅक्शन करण्यात आले तर त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याची तरतूद करण्याचा विचार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) करत आहे.

कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्सची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि त्यांना विशेष लाभ मिळू नये म्हणून एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयच्या या निर्णयामुळे कोणत्याही पेमेंट अ‍ॅपची यूपीआय व्यवहारांमध्ये मक्तेदारी राहणार नाही.

या निर्णयाचा फायदा पेटीएमला
मात्र या निर्णयाचा फायदा पेटीएमला होण्याची शक्यता आहे. UPI ट्रान्झॅक्शनसाठीचे लावले जाणारे शुल्क हे ‘पेटीएम’ला लागणार नाही. पेटीएमकडे पेमेंट्स बँकेचं लायसन्स आहे. त्यामुळे पेटीएमची सेवा थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या श्रेणीमध्ये येत नाही. गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे यांसारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. (NPCI caps UPI transactions on third-party apps at 30%)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

परराज्यातील मजूरांवरून बिहारी नेत्यांना रोहित पवारांचा टोला

Team webnewswala

सरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय

Web News Wala

Gold-Silver Price Today सलग तिसऱ्या दिवशी घसरण

Web News Wala

Leave a Reply