Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान मनोरंजन व्यापार

2021 पासून अमिताभ बच्चन भेटणार अलेक्साच्या रुपात

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमामध्ये घराघरामध्ये पोहचलेला अमिताभ बच्चन आता 2021 पासून अलेक्सा च्या रुपात सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
देवीयो और सज्जनो…

आम्हाला खात्री आहे हे दोन शब्द तुम्ही त्याच टोनमध्ये वाचले असणार. पण सामान्यपणे हे दोन शब्द वाचल्यानंतर डोळ्यासमोर येणार चेहरा म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. आपल्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमामध्ये घराघरामध्ये पोहचलेला अमिताभ बच्चन आता 2021 पासून अलेक्साच्या रुपात सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.होय खरोखरच आता अमिताभ यांचा आवाज अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा वर ऐकायला मिळणार आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अशा अ‍ॅमेझॉनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत करार केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसने अ‍ॅमेझॉन अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे. ‘बच्चन अलेक्सा’ असे या नविन फीचरचे नाव ठेवण्यात आले आहे.

‘बच्चन अलेक्सा’ 2021 पासून ग्राहकांना वापरता येणार

यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जोक, हवामानासंदर्भात माहिती आणि कविता ऐकता येणार आहेत. यासाठी ग्राहकांना काही रक्कम भरावी लागणार आहे. “Alexa, say hello to Mr. Amitabh Bachchan” या व्हाइस कमांडच्या मदतीने ही सुविधा अ‍ॅक्टीव्हेट करता येणार आहे.

टेक्नॉलॉजीमुळे मला नेहमीच नविन गोष्टींसोबत जोडण्याची संधी दिली आहे. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणखी लोकांपर्यंत मला पोहोचता येईल याचा मला विशेष आनंद आहे, असं या कराराबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

Team webnewswala

आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग

Team webnewswala

लाॅकडाउनने बदलला घर विक्रीचा ट्रेंड डिजिटल विक्रीला चालना

Team webnewswala

Leave a Reply