Team WebNewsWala
राष्ट्रीय शिक्षण समाजकारण

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण

कोरोनामुळे दोन वेळा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. यात अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे एका चहावाल्याने थेट पंतप्रधानांना शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवली

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण

Webnewswala Online Team – कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली. कोरोनाकाळात पालक गमावलेल्या मुलांना पीएम केअर फंडमधून 10 लाख रुपये दिले जातील. त्यातून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. कोरोनामुळे आईवडील दोन्ही पालक गमावले आहेत अशा मुलांना पीएम केअर फंडमधून वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत दरमहा आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

याशिवाय ते 23 वर्षांचे झाल्यावर त्यांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. आयुष्मान भारत योजनेंतर्गत या मुलांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमादेखील दिला जाणार आहे.

कुटुंबातील कमावत्या सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ‘एसिक’कडून फॅमिली पेन्शन दिली जाणार आहे. तसेच त्या कुटुंबाला ‘ईडीएलआय’ योजनेंतर्गत विम्याचा लाभही मिळेल.

Web Title – कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण ( Free education for children orphaned by corona )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव

Web News Wala

जितेंद्र शिर्के भारतीय मराठा कल्याण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी

Team webnewswala

हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा

Web News Wala

Leave a Reply