Team WebNewsWala
Other पर्यावरण राजकारण शहर

कोरोना काळात ठाण्यात चार पाच लाखांत घर

कोरोना काळात ठाण्यात चार पाच लाखांत घर घेण्याची सुवर्णसंधी चालुन आली असुन बाळकूमच्या दादलानी परिसरातील मुंबई महापालिकेल्या जलवाहिन्यांना लागून असलेल्या सरकारी भूखंडावर घरांची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत आहे.

ठाणे : कोरोना काळात ठाण्यात चार पाच लाखांत घर घेण्याची सुवर्णसंधी चालुन आली असुन बाळकूमच्या दादलानी परिसरातील मुंबई महापालिकेल्या जलवाहिन्यांना लागून असलेल्या सरकारी भूखंडावर मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळींची निर्मिती सुरू असून करोना काळातही येथील घरांची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत आहे.

येथील भूमाफिया खरेदीदारांना या ठिकाणच्या पत्त्यावर नवे मतदान ओळखपत्रही तयार करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची संख्या वाढू लागल्यामुळे जागेला लागून असलेल्या कांदळवनांची कत्तलही सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

वीज आणि पाण्याची जोडणीही, नवे मतदान ओळखपत्र 

ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या बाळकूम भागात दादलानी हा परिसर आहे. या परिसरातून मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्या जातात. या जलवाहिन्यांना लागून असलेल्या एका सरकारी भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून शेकडो अनधिकृत चाळी उभ्या राहू लागल्या आहेत. या अनधिकृत चाळी उभारणाऱ्यांची एक मोठी साखळी या भागात तयार झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना या घरांची विक्री केली जात आहे. येथील एका घराची किंमत चार ते पाच लाख रुपये असून या किमतीमध्ये वीज आणि पाण्याची जोडणीही घरांना दिली जात आहे.

सर्वसामान्यांना कमी पैशात या सुविधा मिळत असल्यामुळे गरजवंत असलेले अनेकजण या ठिकाणी घर खरेदीला प्राधान्य देत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना येथील भूमाफिया नवे मतदान ओळखपत्र तयार करून देतात. या नव्या घरांच्या पत्त्यावर नवे मतदान ओळखपत्र मिळत असल्यामुळे घर खरेदी करणारेही अगदी निर्धास्त होत आहेत.

येथील नागरिकांना मतदानाचा हक्क मिळत असल्यामुळे भूमाफिया मतदानासाठी त्याचा फायदा करून घेत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. त्यामुळे येथील बांधकामांवर नेमक्या कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे, असा प्रश्न बाळकूम परिसरातील स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत संपर्क साधला असता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या घरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. असे असले तरी या भागात नवी बांधकामे सुरूच असल्याचे चित्र प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे.

कांदळवनांचीही कत्तल 

भूमाफियांनी गेल्या काही दिवसांपासून या भागांमध्ये वेगाने घरे उभारण्यास सुरुवात केली आहे. स्वस्त दरात जागा मिळत असल्याने या भागांमध्ये काही छोटे कारखानेही उभे राहिले आहेत. या अनधिकृत बांधकांच्या सीमा विस्तारत असल्यामुळे नवी घरे बांधण्यासाठी आता भूमाफियांनी कांदळवनांची कत्तलही सुरू केली आहे. या भागातील कारखान्यांमधला कचराही येथील कांदळवनांवर भर टाकण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी लसीकरण केंद्राला खासदार कपिल पाटील यांची भेट

Web News Wala

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री भेट

Web News Wala

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात VI च्या रुपात नवा ब्रँड

Team webnewswala

Leave a Reply