Team WebNewsWala
Other राजकारण राष्ट्रीय

पंतप्रधान मोदी करणार १० डिेसेंबरला संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन १० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता करणार आहेत, अशी माहिती लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन १० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता करणार आहेत, अशी माहिती लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे तर देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण होतील. सरकारचा प्रयत्न २०२१ चे अधिवेशन नव्या संसदेत घेण्याचा आहे, त्यादृष्टीने नियोजन करुन बांधकाम केले जाणार आहे.

संसदेची नवी इमारत भूकंपरोधक असेल. या इमारतीच्या बांधकामात दोन हजार जण प्रत्यक्ष स्वरुपात आणि नऊ हजारजण अप्रत्यक्ष स्वरुपात सहभागी होतील. संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घेऊन ही इमारत बांधण्यात येत आहे. नव्या इमारतीत संसदेचे कामकाज डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जाईल.

संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभेत ८८८ आणि राज्यसभेत ३२६ पेक्षा जास्त आसनांची व्यवस्था असेल. तसेच संसदेच्या संयुक्त अधिवेशनासाठी मध्यवर्ती सभागृहात १ हजार २२४ आसनांची व्यवस्था असेल. ही व्यवस्था फक्त खासदारांना आरामात बसता यावे यासाठी करण्यात येईल.

लोकसभा, राज्यसभा आणि मध्यवर्ती सभागृह येथे पत्रकार कक्ष, मान्यवर (निमंत्रित) कक्ष आणि प्रेक्षागृह तसेच संसदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीचे सभागृहातील कक्ष यांची स्वतंत्र व्यवस्था असेल.

बांधकामासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च

संसदेच्या सध्याच्या इमारतीच्या तुलनेत नवी इमारत १७ हजार चौरस मीटर मोठी असेल. नवी इमारत ६४ हजार ५०० चौरस मीटर एवढ्या मोठ्या परिसरात बांधली जाईल. या बांधकामासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी संसदेची नवी इमारत बांधणार आहे. एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी संसदेच्या नव्या इमारतीचे डिझाइन तयार करणार आहे. श्रम शक्ती भवन या इमारतीच्या जागेवर संसदेची नवी इमारत तयार होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ साकारणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे हे एक भव्यदिव्य मंदिर असेल.

देशाच्या संसदेची सध्याची इमारत एक ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन केली जाणार आहे.

नव्या इमारतीच्या भूमीपजून सोहळ्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले आहे. यापैकी निवडक मान्यवर सोहळ्याला उपस्थित असतील तर काही जण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter

Team webnewswala

भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी नेपाळने हटवली

Team webnewswala

ऑक्टोबर महिन्यापासून झी वाजवा वाहिनीची सुरूवात

Team webnewswala

Leave a Reply