Team WebNewsWala
मनोरंजन शहर

Big Boss च्या माजी स्पर्धक स्वामी ओम यांचं निधन

Big Boss च्या माजी स्पर्धकाचं निधन स्वामी ओम यांनी वादग्रस्त टिव्ही कार्यक्रम Big Boss -१० च्या पर्वात सहभाग नोंदवला होता

Big Boss च्या माजी स्पर्धकाचं निधन स्वामी ओम यांनी वादग्रस्त टिव्ही कार्यक्रम Big Boss १० च्या पर्वात सहभाग नोंदवला होता

मुंबई : बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेले विनोदानंद झा उर्फ स्वामी ओम दिर्घ आजारानं निधन झालं. गाजियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन महिन्यापूर्वी त्यांना करोना विषाणूची लागणही झाली होती. त्यानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. करोनामुक्त झाल्यानंतर स्वामी ओम यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यातच त्यांना इतर आजारानींही जखडलं होते. मात्र, बुधवारी तीन जानेवारी रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील निगम बोध घाटावर स्वामी ओम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Big Boss -१० च्या पर्वात सहभाग

स्वामी ओम यांनी वादग्रस्त टिव्ही कार्यक्रम Big Boss -१० च्या पर्वात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत स्वामी ओम यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये आणि कृत्य केली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. आपल्या विकृत अंदाजाने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ओम स्वामी यांना बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर सलमानला कानाखाली लगावल्याचेही म्हटलं होतं. शिवाय बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी सलमानसह बिग बॉसमधील सहकाऱ्यांवर उलट सुलट बोलणी केली होती.

स्वामी ओम यांची वादग्रस्त मालिका:

देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता.

दिल्लीत नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वामी ओम यांना मारहाण झाली होती.

२००८ मध्ये स्वामी ओम यांच्याविरोधात त्यांच्या भावानेच सायकल चोरल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काही जण जंतरमंतर येथे जमले होते, त्यावेळी कोणालाही पूर्वकल्पना न देता स्वामी ओम त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी ओम स्वामी यांना बेदम मारहाण केली होती.

एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात स्वामी ओम यांनी महिलेला मारहाण केली होती. त्याशिवाय स्वामी ओम बिग बॉस सारख्या रिएलिटी शोमध्ये विविध वक्तव्यामुळे गाजले होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबई १५ जून पर्यंत लॉकडाऊनचे नियम जाहीर

Web News Wala

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे निरूत्साही

Team webnewswala

कोपरी रेल्वे पूल मार्चअखेरीस खुला

Web News Wala

Leave a Reply