आरोग्य शहर समाजकारण

एसटी आगारातील उपहारगृहाना नाथजल विकण्याची सक्ती

उत्पन्नासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘नाथजल‘ बाटलीबंद पाण्याची व्रिक्री केली नाही तर परवाना रद्द करण्याचा इशारा
मुंबई : उत्पन्नासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘नाथजल‘ बाटलीबंद पाण्याची व्रिक्री केली नाही तर परवाना रद्द करण्याचा इशारा महामंडळाने एसटी आगारातील उपहारगृहचालक, दुकानदारांना दिला आहे. सध्या एक लिटर बाटलीबंद पाण्याची मूळ किंमतीतच व्रिक्री करण्याच्याह सूचना केल्या आहेत.दिड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी व्रिक्रीची योजना नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात आली.

नाथजल नावाने या पाण्याची व्रिक्री एसटी आगार, स्थानकातील उपहारगृह, दुकान व अन्य आस्थापनात केली जाते. एक लिटर बाटलीबंद पाणी १५, तर ६५० लिटर १० रुपये असे दर आहेत.

पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, सातारा,अहमदनगर, सोलापूर या विभागात विक्री सुरू झाली. येथे दररोज सहा हजार पाण्याच्या बाटल्यांची व्रिक्री होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. उपहारगृहचालक, दुकानदारांनी फक्त नाथजलचीच व्रिक्री करावी. दुसऱ्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची व्रिक्री न करण्याच्या सूचना आहेत. तसे केल्यास त्याचा परवाना रद्द होईल. अन्य कंपन्याचे बाटलीबंद पाणी एका महिन्यात संपवण्याचेही आदेश आहेत.

याशिवाय १५ रुपये बाटलीबंद पाण्याची व्रिक्री चढय़ा दराने केल्यासही परवाना रद्द केला जाईल. सध्या महामंडळाच्या बसस्थानकांवर अनधिकृत बाटलीबंद पाण्याची व्रिक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारकांचाही सुळसुळाट आहे.स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अनधिकृतपणे पाण्याची व्रिक्री करणाऱ्या परवानाधारकांबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

एप्रिल २०२१ पर्यंत राज्यातील एसटीच्या सर्व आगार, बस स्थानकात फक्त नाथजलचीच विक्री झाली पाहिजे, असे उद्दिष्ट आहे. आगार, स्थानकातील उपहारगृह, दुकानदारांनी अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकू नये व नाथजल चीच विक्री करणे बंधनकारक केले आहे.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कशेळी ब्रिज जवळ कंटेनर थेट पुलावरून कोसळला खाडीमध्ये

Team webnewswala

मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण

Web News Wala

राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा

Web News Wala

Leave a Reply