Team WebNewsWala
आरोग्य क्राईम राष्ट्रीय

कोरोना लसीवर MRP छापायची सक्ती

Corona Vaccine देशाला चालू वर्षात मिळून करोनावरील लसींचे सुमारे 187 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतील. त्यातून सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्याचा विश्‍वास

कोरोना लसीवर एमआरपी छापायची सक्ती

Webnewswala Online Team – 1000 रुपयांहून जास्त किंमत मोजून देशातील 23 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आहे, तर कोरोना लस कंपन्यांना सरकारने लसीवर MRP छापण्याची सक्ती करावी, असं 83 टक्के लोकांनी मत मांडल्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘लोकल सर्कल’ या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमधून समोर आली आहे.

भारतात लसीकरणासाठी सध्या सीरमची कोल्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा वापर केला जात आहे. या दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारला 150 रुपये प्रति डोस या किंमतीने लस दिली होती. राज्य सरकारांना मात्र 300 आणि 600 रुपये या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

लस देताना खासगी रुग्णालये लोकांना लुटत आहे

खासगी रुग्णालये कोव्हिशिल्डची लस 600 रुपयांना तर कोव्हॅक्सिनची लस ही 1200 रुपयांना विकत घेऊ शकतात. पण हीच लस लोकांना देताना खासगी रुग्णालये त्यांना लुटत असल्याचे दिसत आहे. अनेक लोकांनी केलेल्या तक्रारीवरुन असे समोर आले आहे की खासगी रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्डची लस ही प्रति डोस 1000 ते 1200 रुपये तर कोव्हॅक्सिनची लस ही प्रति डोस 1500 रुपये ते 2000 रुपयांना विकत आहेत आणि भरमसाठ नफा कमवत आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या प्रत्येक डोसवर किती शुल्क आकारले जाते आणि त्यावर कोणत्या सेवा दिल्या जातात यावरही आपल्या सर्व्हेमधून लोकल सर्कल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने प्रकाश टाकला आहे. केंद्र सरकारने लस निर्मिती कंपन्यांना MRP छापायची सक्ती करावी, तसेच खासगी रुग्णालयात लसीच्या नोंदणीसाठी अतिरिक्त नोंदणी शुल्क आकारले जात आहे, त्यावर नियंत्रण आणावे.

लस निर्मिती कंपन्यांना त्यांच्या लसीची नेमकी विक्री किंमत म्हणजे MRP काय आहे हे जाहीर करण्याचे बंधन केंद्र सरकारने घालावे, असे मत लोकांनी व्यक्त केले आहे. जर लोकांना देण्यात येणाऱ्या लसीवर एमआरपी असेल तर यामधील काळाबाजार आणि अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे, त्याला आळा बसेल असे अनेक लोकांना वाटत आहे.

या सर्व्हेमध्ये असे समोर आले आहे की 23 टक्के लोकांनी खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या लसीचे प्रत्येक डोस हा 1000 ते 2000 रुपये शुल्क देऊन घेतला आहे. 

Web Title – कोरोना लसीवर एमआरपी छापायची सक्ती ( Forced to print MRP on corona vaccine )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

तुपामुळे वजन वाढते ? तूप खाण्याचे फायदे नक्की वाचा

Web News Wala

काय आहे Google Tax, कंपन्यांना लागेल Equalisation levy

Web News Wala

नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs

Team webnewswala

Leave a Reply