राजकारण राष्ट्रीय व्यापार समाजकारण

पहिल्यांदाच…फळं आणि भाज्यांनाही मिळणार हमीभाव

केरळ सरकारने फळं आणि भाज्यांसाठी [ हमीभाव ] किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइज) निश्चित केली आहे. अशाप्रकारे भाज्यांसाठी एमएसपी निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

केरळ सरकारने फळं आणि भाज्यांसाठी [ हमीभाव ] किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइज) निश्चित केली आहे. अशाप्रकारे भाज्यांसाठी एमएसपी निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. केरळमधील शेतकऱ्यांना सरकारकडून भाज्यांसाठी देण्यात येणारे [ हमीभाव ] आधारभूत मूल्य हे उत्पादन शुल्काच्या २० टक्के अधिक असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ही योजना एक नोव्हेंबरपासून राज्यभरात लागू होणार असल्याची माहिती दिली आहे.

केरळमधील शेतकऱ्यांना १६ भाज्यांसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित

विजयन यांनी या योजनेची ऑनलाइन माध्यमातून सुरुवात करताना अशाप्रकारे पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भाजी पिकांसाठी एमएसपी देण्यात येणार आहे. केरळमधील शेतकऱ्यांना १६ भाज्यांसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला असून या निर्णयाचा केरळमधील शेतकरींना फायदा होईल. हा एमएसपीमुळे शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक मदत मिळेल. शेतकऱ्यांची मिळकत वाढण्यासाठीही मदत होईल. शेतकऱ्यांना होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांना शेतीमधील उत्पन्नासंदर्भात अधिक विश्वास निर्माण होईल, असं मत विजयन यांनी व्यक्त केलं आहे.

विजयन यांनी बाजारामधील मूल्य हे किमान किंमतीपेक्षा खाली गेल्यास शेतकऱ्यांना एमएसपीची म्हणजेच हमीभाव देण्यात येईल. त्यांचा शेतमाल सरकारच्या माध्यमातून एमएसपीवर खरेदी केला जाईल. मालाच्या गुणवत्तेनुसार वर्गिकरण करुन एमएसपी निश्चित करण्यात येईल. देशभरातील शेतकरी असंतुष्ट आहेत. मात्र केरळ सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. मागील साडेचार वर्षांच्या कालावधीमध्ये सरकारने शेती संबंधित अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळेच या कालावधीमध्ये केरळमधील भाज्यांचे उत्पादन दुप्पट झालं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

भाज्यांचे उत्पादन हे सात लाख टनांवरुन १४ लाख टनांपर्यंत वाढल्याचं सांगण्यात आलं आहे.

एकूण २१ गोष्टींसाठी हमीभाव निश्चित

केरळ सरकारने खाण्यापिण्यासंदर्भातील एकूण २१ गोष्टींचे आधारभूत मूल्य निश्चित केलं आहे. राज्यामध्ये केळ्यासाठी ३० रुपये प्रती किलो, अननसासाठी १५ रुपये प्रती किलो, तापियोकासाठी १२ रुपये प्रती किलो आणि टोमॅटोसाठी आठ रुपये प्रती किलो हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. कर्नाटकमध्येही अशाप्रकारे शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासंदर्भातील विचार सुरु आहे. तर पंजाबमध्ये शेतकऱ्यांनाही अशाप्रकारचा हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी राज्य सरकारने भाज्या आणि फळांसाठी हमीभाव जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनही द्राक्ष, टोमॅटो आणि कांद्यासारख्या पिकांना राज्य सरकारने हमीभाव द्यावा अशी मागणी केली जाते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Paws Dombivali चा महाशिवरात्री निमित्त अनोखा उपक्रम

Web News Wala

योगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांची अँब्युलन्सला टायर देत कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत

Web News Wala

कोरोना काळात ही गौतम अदानी यांची बक्कळ कमाई

Web News Wala

Leave a Reply