Team WebNewsWala
आरोग्य

पोटावरची चरबी घटवण्याचे पाच सोपे उपाय

पोटावर चरबी साठू लागली की हे वजन कमी कसे करावे या चिंतेत आणखी खाल्ले जाते. यावर सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास पोटाचा घेर कमी होतो, (five easy belly fat removing tips)

पोटावर चरबी साठू लागली की हे वजन कमी कसे करावे या चिंतेत आणखी खाल्ले जाते. यामुळे फक्त वजन वाढत राहते, पण समस्या सुटत नाही. यावर सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास पोटाचा घेर कमी होतो, चरबी घटवणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते. (five easy belly fat removing tips)

तासन तास कॉम्प्युटर समोर करत बसायच्या कामांमुळे अनेकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. सततच्या बैठ्या कामांसोबत वारंवार चहा, कॉफी तसेच काही तरी खात राहण्याची सवय आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. जंकफूड आणि फास्टफूडचे वाढते सेवन, पाकीटबंद तळलेले पदार्थ, कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम, केक, पेस्ट्रीज यांच्या सेवनामुळे कामापेक्षा वेगाने वजन वाढत आहे.

हे आहेत पोटावरची चरबी घटवण्याचे पाच सोपे उपाय

weight loss

थोडे थोडे खावे आणि चावून चावून खावे

आपण दिवसातून २-४ वेळा खायला हरकत नाही पण थोडे थोडे खा. दर तीन किंवा चार तासांनंतर थोडे पदार्थ खा. यात ताजी फळे, ताजे सॅलड खाऊ शकता. मीठ, मसाला यांचा वापर करणे टाळा आणि पदार्थाची नैसर्गिक चव एन्जॉय करा. प्रत्येक घास हा किमान ३२ वेळा सावकाश आणि व्यवस्थित चावून खाण्याची सवय लावून घ्या. या सवयीमुळे तोंडात मोठ्या प्रमाणावर लाळेची निर्मिती होते. आणि पदार्थाचे पचन होण्यास मदत होते. तसेच भरपूर खाल्ले असे वाटते, मनाचे समाधान झाल्यामुळे भूक लवकर भागते. पदार्थ संपवण्यापेक्षा भूक भागेपर्यंतच खाण्याची सवय लावून घ्या.

गरम पाणी प्या
पोटावर चरबी साठू लागली की हे वजन कमी कसे करावे या चिंतेत आणखी खाल्ले जाते. यावर सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास पोटाचा घेर कमी होतो, (five easy belly fat removing tips)

स्वतःसोबत कायम १ किंवा २ लिटर पाण्याचा थर्मास बाळगा. या थर्मासमध्ये गरम पाणी भरुन ठेवा. दिवसभरात जेव्हा किमान ३-४ लिटर गरम पाणी पिऊन संपवायचे हे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून सुरुुवात करा. आधी गरम पाणी असल्यामुळे जास्त प्यायले जाणार नाही पण हळू हळू सवय होईल. चार लिटरपेक्षा जास्त गरम पाणी सहज पिऊ शकत असाल तरी हरकत नाही. गरम पाणी पोटातील पदार्थांचे पचन करण्यास मदत करते. तसेच गरम पाण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मोठी मदत मिळते. गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिणार असाल तरी हरकत नाही.

मॉर्निंग वॉक
पोटावर चरबी साठू लागली की हे वजन कमी कसे करावे या चिंतेत आणखी खाल्ले जाते. यावर सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास पोटाचा घेर कमी होतो, (five easy belly fat removing tips)

दररोज सकाळी किमान एक तास शक्य तितक्या वेगाने चालण्याचा व्यायाम करा. धावणे शक्य असल्यास अतिशय उत्तम. हा व्यायाम करताना योग्य प्रकारचे स्पोर्ट्स शूज वापरा. पायाला, गुडघ्याला दुखापत होणार नाही याची काळजी घेत हा व्यायाम करा. पहाटे पाच ते सात दरम्यान हा व्यायाम करणे सोयीचे आहे. यावेळी प्रदूषण कमी असते. हवेत ऑक्सिजन भरपूर असतो. तसेच वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे बाहेर फेरफटका मारायला जाणे सोयीचे आहे. मॉर्निंग वॉक शरीराच्या हालचाली सुरळीत राहतात. सतत बैठे काम करत असाल तर हा व्यायाम नक्की करा. फायदा होईल.

योगासने

आपण योगासने करू शकात असाल तर पोटाचा घेर नियंत्रित ठेवणे आणखी सोपे होईल. योगासने येत नसल्यास अनुभवी व्यक्तीच्या देखरेखीत किमान सूर्यनमस्कार, नौकासन तसेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त असलेली इतर आसने शिकून घ्या. तज्ज्ञांच्या समोर आसने करा. त्यांनी सर्व आसने व्यवस्थित येत असल्याची ग्वाही देईपर्यंत परस्पर एकटे असताना आसने करणे टाळा.

रात्री उशिरा खाणे टाळा

सूर्यास्तानंतर जेवणे टाळा. रात्रीचे जेवण आणि झोप यात किमान दोन तास अंतर राहील याची खबरदारी घ्या. तेलकट पदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड, पाकीटबंद तळलेले पदार्थ, कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम, केक, पेस्ट्रीज, मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरीतले पदार्थ खाणे टाळा. सर्व प्रकारची व्यसने टाळा. शक्य झाल्यास मांसाहार टाळा अथवा कमी करा. रात्री जेवणाऐवजी फक्त एक ग्लास दूध पिऊन झोपलात तरी हरकत नाही.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Corbevax सर्वात स्वस्त लस, 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

Web News Wala

Corona Vaccination लसीच्या नावाखाली लूट

Web News Wala

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच

Web News Wala

Leave a Reply