Team WebNewsWala
पर्यावरण शहर

रत्नागिरी मधील मच्छिमार जेलिफिश ने हैराण

मच्छीमारांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. मासेमारीसाठी पाण्यात टाकलेल्या जाळ्यात विषारी 'जेलीफिश' सापडत असल्याने मच्छीमार धास्तावले
रत्नागिरी मधील मच्छिमार जेलिफिश ने हैराण

रत्नागिरी : मच्छीमारांना मासे चांगल्या प्रमाणात मिळत असताना मच्छीमारांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. मासेमारीसाठी पाण्यात टाकलेल्या जाळ्यात विषारी ‘जेलीफिश’ सापडत असल्याने मच्छीमार धास्तावले आहेत.

समुद्रात हेलकावे घेणार्‍या छत्रीच्या आकाराचे जेलीफीश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती आपल्याला जखमी करू शकतात. गेल्या काही वर्षांत जेलीफीशच्या डंखामुळे मच्छीमार जखमी झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. समुद्रकिनारपट्टी परिसरात साधारण तीन प्रकारचे जेलीफीश आढळतात. ठराविक मोसमात हे जेलीफिश किनार्‍यालगत येतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू-बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू-बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीफिश किनार्‍यालगत येतात.

वजनाने हलके असल्याने वार्‍याच्या दिशेने हेलकावे खात ते समुद्रकिनारी पोहोचतात.

मोठ्या जेलीफिशचे शरीर 10 इंच आकाराचे आणि दोरीसारखे 2 फूट लांबीचे पाय असतात. जेली फिशचा एखाद्याला डंख झाल्यास त्याठिकाणी लाल रंगाचे व्रण उठतात. तसेच त्या व्यक्‍तीला असह्य वेदना होतात. समुद्रात टाकलेली जाळी बोटीत घेताना त्यामध्ये अडकलेले जेलीफिश काढून फेकून देताना या जेलीफिशचे तंतू मच्छिमारांसह कामगारांच्या हातांना स्पर्श करीत असल्याने अंगाला मोठी खाज सुटते. त्यामुळे खलाशी कामगारांना कुठलीही इजा होऊ नये, यासाठी मच्छीमार बांधव समुद्रात जेलीफिश दिसल्यास त्या भागात मासेमारी करत नाही. त्यामुळे खर्च फुकट जातो.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोविड 19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

Team webnewswala

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Team webnewswala

वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020

Team webnewswala

Leave a Reply