Team WebNewsWala
सिनेमा

करण जोहरच्या ‘Mumbaikar’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

करणने नुकताच त्याच्या आगामी चित्रपट Mumbaikar चा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. करण सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. करणने नुकताच त्याच्या आगामी चित्रपट Mumbaikar चा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करणने हा पोस्टर ट्विटरवर ट्वीट केला आहे. हा पोस्टर ‘Mumbaikar’ या आगामी चित्रपटाचा आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव मोठ्या अक्षरात लिहिल असून प्रत्येक अक्षरात मुख्य भूमिका साकारणारा एक कलाकार आहे. पोस्टरमध्ये उडणारे काही पक्षी आणि मरीन ड्राइव्ह दिसत आहे. मल्याळम चित्रपट दिग्दर्शक शिबू थामीन्स या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता विजय सेतुपतीसुद्धा याच चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

पोस्टर शेअर करत, “मला खात्री आहे की तुम्हाला एक जबरदस्त सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळेल. संपूर्ण कलाकारांच्या टीमला शुभेच्छा.” अशा आशयाचं कॅप्शन करणने दिलं आहे.

या चित्रपटाची निर्मिती संतोष सिवन करत आहेत. बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनीदेखील चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Saina Poster Trolling वर अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर

Web News Wala

सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश

Web News Wala

मराठीतला पहिला ‘झॉम-कॉम’ सिनेमा ‘झोंबिवली’

Team webnewswala

Leave a Reply