शहर

लोटे एमआयडीसी मध्ये आगीचे सत्र सुरूच M R Farma कंपनीत आग

M R Farma केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

खेड लोटे एमआयडीसी मध्ये आगीचे सत्र सुरूच येथील M R Farma कंपनीत आग

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील (khed) लोटे एमआयडीसीत (Lote MIDC) पुन्हा एकदा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. M R Farma केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

लोटे एमआयडीसीतील M R Farma केमिकल कंपनीत (MR Pharma Chemical Company Ratnagiri) भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरला असून अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे.

धुराचे लोट हे तब्बल 10 किमी अंतरावरून दिसून येत आहे

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या दुर्घटनेत अद्याप मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे.

लोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना

लोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना आहे. मागील महिन्यात 20 मार्च रोजी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये (Gharda Chemical Company) भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले होते.

तसंच लोटे औद्योगिक वसाहती (Lote MIDC) मधील प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत (Shree Samarth Engineering Chemical Company) रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर सात जण गंभीररित्या जखमी झाले होते.

मागील आठवड्यातच श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग

तर, मागील आठवड्यातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. आगीमुळे आणि लागोपाठ 10 ते 12 स्फोटांमुळे लोटे परिसर अक्षरशः हादरून गेला होता. या दुर्घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

Title – खेड लोटे एमआयडीसी मध्ये आगीचे सत्र सुरूच येथील एम.आर.फार्मा कंपनीत आग ( Fire at M R Pharma in Khed Lotte MIDC )

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

MumUni School of Thoughts च्या माध्यमातुन शिक्षणव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण संयमी चर्चा

Team webnewswala

अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी

Web News Wala

उंच इमारतीच्या कठड्यावर खतरनाक स्टंट, Video Viral

Team webnewswala

Leave a Reply