Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय राजकारण

भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी नेपाळने हटवली

नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी या वाहिन्या बंद केल्या आहेत. नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

काठमांडू – भारत आणि नेपाळमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या आणि इतर वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटवण्यास आता नेपाळने सुरुवात केली आहे. नेपाळ डिश होमचे संचालक सुदीप आचार्य यांनी रविवारी सांगितले की, सर्व भारतीय वाहिन्यांचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आता भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटवण्यास आता नेपाळने सुरुवात केली आहे.

9 जुलैला घातली होती भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी

दोन्ही देशात तणाव वाढल्यानंतर नेपाळने 9 जुलैला भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घातली होती. नेपाळविरोधात भारतीय वृत्तवाहिन्या वृत्त देत असल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आली होती. पण, दूरदर्शनचे प्रसारण नेपाळमध्ये सुरू होते. आता नेपाळमध्ये पुन्हा वृत्तवाहिन्यांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. नेपाळच्या संसदेत गेल्या महिन्यात वादग्रस्त नकाशाला मंजुरी देण्यात आल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या नकाशात नेपाळने कालापानी हा भारताचा भूभाग त्यांच्या नकाशात दाखवल्याने भारताचा त्याला विरोध आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन

Web News Wala

करोना लसीचा पहिला डोस मिळणार भारतीय वंशाच्या व्यक्तीला

Team webnewswala

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल

Team webnewswala

Leave a Reply