Team WebNewsWala
तंत्रज्ञान सिनेमा

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण दिग्दर्शक बावधन गावातील दिगंबर वीरकर या नवोदित दिग्दर्शकाने केला आहे. चक्क आयफोनवर संपूर्ण 'पिच्चर' चे चित्रीकरण

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

Webnewswala Online Team – मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण दिग्दर्शक गेल्या काही वर्षांत नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक भन्नाट प्रयोग वाईच्या बावधन गावातील दिगंबर वीरकर या नवोदित दिग्दर्शकाने केला आहे.

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

चित्रपटाच्या वेडापायी दिगंबर यांनी चक्क आयफोनवर संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. ‘पिच्चर’ असे त्यांच्या चित्रपटाचे नाव असून आयफोनवर संपूर्ण चित्रित होणार हा पहिला चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेताही आपल्या जिद्दीच्या जोरावर दिगंबर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन, पटकथा, सिनेमॅटोग्राफी आणि संकलन या जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. निर्मितीसाठी महेश्वर पाटणकर, सचिन गायकवाड, नीलेश साळुंखे, मंगेश हाबडे, श्रीकांत निकम या मित्रांनी खारीचा वाटा उचलला.

नवोदित कलाकारांच्या जीवन संघर्षाची गाथा असा आशयघन विषय ‘पिच्चर’मध्ये आहे. या चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. केदार दिवेकर याने पार्श्वसंगीत दिले असून चित्रपटाचे साउंड डिझायनिंग निखिल लांजेकर यांचे आहे. चित्रपटात एकही गाणे नाही.

चित्रपट हे माध्यम माझ्यासाठी नवीनच आहे. माझ्यातल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी या माध्यमाची मला मोठी मदत झाली. एमएक्स प्लेअरवर हा चित्रपट पाहता येईल. 

दिगंबर वीरकर, दिग्दर्शक

Web Title – चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण ( Filming the entire ‘pitcher’ on a pretty iPhone )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

आता OTT Platform लाही केंद्राची नियमावली

Web News Wala

Task Mate App टास्क पूर्ण करुन कमवा पैसे

Team webnewswala

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

Web News Wala

Leave a Reply