Team WebNewsWala
पर्यावरण शहर

कोस्टल रोड साठी मुंबईच्या समुद्रात महाकाय दगडांचा भराव

कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असून वरळी हाजी अली भागात भराव टाकण्यात येत आहे. भराव घालण्यासाठी नवी मुंबई विमानतळ या भागातून महाकाय दगड मुंबईत

मुंबई – webnewswala Online Team

कोस्टल रोड साठी मुंबईच्या समुद्रात महाकाय दगडांचा भराव

कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असून वरळी सह हाजी अली व अन्य भागात मोठ्या प्रमाणात माती व दगडचा भराव टाकण्यात येत आहे. समुद्रात भराव घालण्यासाठी नवी मुंबई विमानतळ या भागातून महाकाय दगड ट्रेलर वरून मुंबईत आणण्यात येत आहेत.

नवी मुंबई विमानतळ परिसरातून महाकाय दगड मुंबईत

साखळदंडाने बांधलेले हे दगड मुख्य रस्त्यावरून भराव भूमीपर्यंत उघड्या ट्रकवरून नेण्यात येतात. हा ट्रक शेजारून जाताना अन्य वाहनांचा जीव अक्षरश: दडपून जातो एवढ्या प्रचंड आकाराच्या या शिळा असतात.

कोस्टल रोडसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड व मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय या मार्गावर बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलांचे कामही सुरू झाले आहे.

कोरोना संचारबंदी असल्यामुळे दिवसाही दगडांची वाहतूक

शामलदास गांधी उड्डाणपूल’ (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या (वांद्रे वरळी सी लिंक) दरम्यान उभारण्यात येणार्‍या कोस्टल रोडसाठी 90 हेक्टर एवढ्या किनारपट्टीत हा दगड व मातीचा भराव टाकण्यात येत आहे. या भरावासाठी मुंबईत मोठे दगड उपलब्ध नसल्यामुळे नवी मुंबई विमानतळाजवळील भागातून महाकाय दगड आणण्यात येत आहेत. वाशी नाक्यावरून हे दगड चेंबूर, दादर मार्गे तर काही दगड सायन, माहीम मार्गे वरळी पर्यंत नेेण्यात येतात. रात्रीच्या वेळीच या दगडांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. सध्या कोरोना संचारबंदी असल्यामुळे दिवसाही दगडांची वाहतूक करण्यात येत असल्याचे पालिकेच्या कोस्टल रोड विभागाकडून सांगण्यात आले.

नवी मुंबई विमानतळ परिसरातून महाकाय दगड मुंबईत

समुद्रातील भरावासाठी मोठ्या दगडांची आवश्यकता असते. हे दगड समुद्र किनार्‍यावर टाकल्यानंतर त्यावर माती टाकून भराव करण्यात येतो. मुंबई मोठे दगड मिळणे अशक्य असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर नवी मुंबई विमानतळ परिसरातून महाकाय दगड मुंबईत आणत आहेत. हे दगड एवढे मोठे आहेत की, एका ट्रेलरवरून दोन किंवा तीनच दगडांची वाहतूक शक्य होते. भराव भूमीवर दगड आल्यानंतर ते क्रेनच्या सहाय्याने समुद्रात टाकण्यात येतात. हा भराव टाकत असताना 7.47 किमी लांबीची किनारा रक्षक भिंतही बांधण्यात येणार असल्याचे किनारा प्रकल्पाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.

Title – कोस्टल रोड साठी मुंबईच्या समुद्रात महाकाय दगडांचा भराव ( Filling of giant stones in the sea of ​​Mumbai for Coastal Road )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

अभिनेता भूषण कडू च्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

Web News Wala

मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण

Web News Wala

चौथ्यांदा दंड झाल्यास लायसन्स रद्द

Team webnewswala

Leave a Reply