पर्यावरण शहर

राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा

कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळांच्या मालिकांमुळे राज्यात कुठे ना कुठे प्रत्येक महिन्यात पाऊस पडत असल्याने सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा ठरला आहे.

राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा

Webnewswala Online Team – कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळांच्या मालिकांमुळे राज्यात कुठे ना कुठे प्रत्येक महिन्यात पाऊस पडत असल्याने सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा ठरला आहे. यंदा हिवाळ्यात तापमान वाढ झाली आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या झळाही अतितीव्र झाल्या नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही हंगाम झाकोळून गेले आणि केवळ पावसाळ्याचेच वर्चस्व निर्माण झाल्याची स्थिती राज्यात आहे. देशातही बहुतांश भागात यंदा अशीच स्थिती पाहावयास मिळाली.

राज्यात यंदाचा हिवाळा आणि उन्हाळाही झाकोळला

गतवर्षी २०२० मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे यामुळे देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, तर हातातोंडाशी आलेल्या शेतीचेही अतोनात नुकसान झाले. २०२० मध्ये जानेवारीच्या सुरुवातीलाच ऐन थंडीत विदर्भात गारपिटीने पिकांची दाणादाण उडवून दिली, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही जोरदार पावसाने शेतीचे नुकसान केले.

फेब्रुवारी ते मे महिन्यांत ठिकठिकाणी पाऊस होता. जून ते सप्टेंबर या हंगामात तर हक्काचा मोसमी पाऊस होताच. पण, त्यानंतरही कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसतच राहिला. ऐन थंडीच्या मोसमात डिसेंबरमध्येही पाऊस होता, तो २०२१ या नवीन वर्षांच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कायम राहिला. त्यामुळे थंडीच्या वाटेत दक्षिणेकडून येणारे उष्ण वारे आणि कमी दाबाचे पट्टे अडथळे ठरले.

जानेवारी २०२१ मध्ये सलग तेराव्या महिन्यांत पावसाची नोंद

जानेवारी २०२१ मध्ये सुरुवातीलाच पाऊस होऊन सलग तेराव्या महिन्यांत पावसाची नोंद झाली. फेब्रुवारीचे सुरुवातीचे काही दिवस कोरडे गेल्यानंतर थेट गारपिटीचेच संकट राज्यावर आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. मार्चच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच मध्यावर मात्र पुन्हा हवामानाने फिरकी घेतली आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. एप्रिलमध्येही पहिल्या आठवडय़ानंतर बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली. पावसाळी स्थिती एप्रिल अखेपर्यंत कायम राहिल्याने उन्हाच्या झळा तीव्र होऊ शकल्या नाही. मे मध्येही तीच स्थिती राहिली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळाने ढगाळ वातावरण आणि पाऊस कायम राहिल्याने उन्हाळा झाकोळून गेला.

चक्रीवादळांची मालिका

समुद्रातील चक्रीवादळे, जमीन किंवा समुद्रातून येणारे कमी दाबाचे पट्टे अवकाळी पावसाला कारणीभूत ठरल्याचे दिसून येते. २०२० मध्ये समुद्रांत चक्रीवादळांची मालिकाच निर्माण झाली होती. त्यातील अम्फन, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी या चक्रीवादळांनी धुमाकूळ घातला. निसर्ग आणि गती हे अरबी समुद्रात, तर इतर तीन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झाली होती. निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने महाराष्ट्रात हाहाकार उडवून दिला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्यामुळे या वर्षांत मोठा पाऊस झाला. अरबी समुद्रात नुकतेच येऊन गेलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळेही मोठी हानी होण्यासह जोरदार पाऊस झाला. आता बंगालच्या उपसागरात ‘यास’ नावाच्या चक्रीवादळाचे संकेत आहेत.

Title – राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा ( Fifteen consecutive months of rains in the state )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

भिवंडी लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न

Web News Wala

मोरा – भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरात वाढ

Web News Wala

Versova Sea Link कामाला गती

Web News Wala

Leave a Reply