क्राईम तंत्रज्ञान मनोरंजन व्यापार शहर

खोट्या TRP चं रॅकेट उघड रिपब्लिक चौकशीच्या घेऱ्यात

पोलिसांकडून खोट्या TRP चं रॅकेट उघड; दोन मराठी चॅनलच्या चालकांना अटक; रिपब्लिकही चौकशीच्या घेऱ्यात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला
पोलिसांकडून खोट्या TRP चं रॅकेट उघड; दोन मराठी चॅनलच्या चालकांना अटक; रिपब्लिकही चौकशीच्या घेऱ्यात

मुंबई : आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं आहे. यामध्ये तीन वाहिन्यांचा समावेश असल्याचे समोर आले असून यामधील दोन वाहिन्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केला आहे

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बॉक्स सिनेमा‘ आणि ‘फक्त मराठी‘ या मराठी वाहिन्याच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. ‘रिपब्लिक‘ टेलिव्हिजन याचाही खोट्या टीआरपी रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एखादे चॅनल सुरू ठेवण्यासाठी कुटुंबाला तब्बल 300 ते 400 रुपये दिले जात होते. टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या घरांमध्ये बार्कचं मीटर लावले आहेत, त्या कुटुंबांना पैसे देऊन डेट्यामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. इंग्रजीतील प्रसिद्ध रिपब्लिक टिव्हीचे प्रोमोटरही रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मुंबई पोलिसांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे.

जाहिराती मिळविण्यासाठी या बनावट टीआरपीची मदत

यापुढे या तीनही वाहिन्यांच्या बँक खात्यांची चाचणी केली जाईल व ही रक्कम रॅकेटमधून आल्याचे समोर आल्यास जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाहिराती मिळविण्यासाठी या बनावट टीआरपीच्या आकड्यांची मदत घेतली गेली आहे. पोलिसांकडून याचा तपास केला जाणार आहे. असे आढळल्यास कारवाई करीत ही रक्कम जप्त करण्यात येईल. BARC ने हंसा नावाच्या एजन्सीला कंत्राट दिले होते. त्यातील काही माजी कर्मचाऱ्यांनी तो डेटा काही टिव्ही चॅनलला पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आज दोघांना अटक करण्यात आली

इंग्रजी येत नसलेल्या घरांमध्ये इंग्रजी चॅनल सुरू असल्याचे समोर आले आहे. 2000 हून कमी घरांची निवड करण्यात आली होती. या घरांमध्ये ठराविक चॅनल लावण्याचा अट्हास केला जात होता. आणि यासाठी त्यांना काही रक्कम दिली जात होती. आज ‘बॉक्स सिनेमा‘ आणि ‘फक्त मराठी‘ या मराठी वाहिन्याच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका व्यक्तीकडून 20 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर साडे आठ लाख रुपयांची कॅश त्याच्या बँकेच्या लॉकरमधून घेण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आता जगभरातील Android टीव्हींसाठी JioPages

Web News Wala

5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड

Web News Wala

SEBI चा गुंतवणूकदारांना दिलासा, IPO प्रक्रियेसाठी SMS सूचना लागू

Web News Wala

Leave a Reply