Team WebNewsWala
Other शहर

एक्स्प्रेस लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद हे वृत्त चुकीचं

भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल केला असून आता रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकामधून रेल्वे सुटण्याच्या पाच मिनिटे अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे.

मुंबई  करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लोकल एक्स्प्रेस सेवा बंद करण्यात आली होती. नंतर या निर्णयाला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मात्र ही मुदतवाढ ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली हे वृत्त चुकीचं असल्याचं रेल्वेने म्हटलंय. एक्स्प्रेस लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार हे वृत्त चुकीचं असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाउन असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. एक्स्प्रेस लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत असं पत्रक आल्याचं काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं. मात्र हे वृत्त चुकीचं आहे असं स्पष्टीकरण अशा प्रकारचं कोणतंही पत्रक काढण्यात आलेलं नाही असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही हे वृत्त चुकीचं आहे असं म्हटलंय.

३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल आणि एक्स्प्रेस बंद राहणार असं या पत्रकात म्हटलं होतं. मात्र या पत्रकाला काहीही अर्थ नाही असं म्हटलं आहे. सध्याच्या घडीला मुंबईत मर्यादित स्वरुपात लोकल सेवा सुरु आहे. मात्र या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत आहेत. लॉकडाउन आणि करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लोकल, मेल आणि एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या. मात्र स्थलांतरित मजुरांसाठी ट्रेन्स सोडण्यात आल्या. नंतर अत्यावश्यक सेवांसाठी लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

MIDC चा Server hack हॅकर ची 500 कोटींची मागणी

Web News Wala

सोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली

Web News Wala

वांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम

Web News Wala

1 comment

Leave a Reply