Team WebNewsWala
Other पर्यावरण पोटोबा शहर

१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री

ठाणे शहरामध्ये उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनांवर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. याकरता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी‘, ही संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे धोरण आहे.

याच धोरणाला प्रतिसाद देत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाण्यातउद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

ठाणे शहरामध्ये उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

सदरचा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने उद्या प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या नैसर्गिक व सेंद्रिय असून त्या सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांनी आणि औषधी तत्त्वांनी संपन्न आहेत. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळ भाज्या, फूल भाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.

ठाणे शहरामध्ये उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

या रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरता रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. रानभाज्या विक्री आणि प्रदर्शनाला जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी अशी विनंती अंकुश माने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ठाणे यांनी केली आहे.

नक्की वाचा >> 
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू
मॉरिशस मध्ये ऑइल गळतीमुळे पर्यावरणीय आणीबाणी

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रंगीत मतदार ओळखपत्र हवे आहे ? असा करा अर्ज

Team webnewswala

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती

Team webnewswala

ऑनलाईन औषध बाजार वर्चस्वासाठी रिलायन्स अ‍ॅमेझॉन युद्ध

Team webnewswala

5 comments

पुण्यात सुरु झाले वॉरिअर आजीबाईं चे मार्शल आर्ट्स क्लास - Web News Wala August 24, 2020 at 5:35 pm

[…] १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प… […]

Reply
झाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार - Web News Wala August 24, 2020 at 5:41 pm

[…] १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प… […]

Reply
स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच - Team WebNewsWala September 18, 2020 at 10:32 pm

[…] १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प… […]

Reply
परराज्यातील मजूरांवरून बिहारी नेत्यांना रोहित पवारांचा टोला - Team WebNewsWala September 19, 2020 at 11:59 am

[…] १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प… […]

Reply
देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:00 pm

[…] १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प… […]

Reply

Leave a Reply