Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्राईम

तीन धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जेरुसलेम चा इतिहास प्रत्येकाला माहीत असायला हवा

इस्रायल पॅलस्टाइन वाद. पुन्हा एकदा जेरुसलेम शहराचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या अल अक्सा मशिदीच्या आवारात रॉकेट हल्ला आणि चकमकी झाल्या आहेत. तीन धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जेरुसलेम चा इतिहास प्रत्येकाला माहीत असायला हवा

तीन धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जेरुसलेम चा इतिहास प्रत्येकाला माहीत असायला हवा

webnewswala Online Team

जगात सर्वाधिक काळ सुरू असलेल्या वादापैकी एक म्हणजे इस्रायल पॅलस्टाइन (Israel-Palestine tensions) वाद. पुन्हा एकदा जेरुसलेम शहराचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या अल अक्सा मशिदीच्या आवारात (Al-Aqsa Mosque, Jerusalem clashes) रॉकेट हल्ला आणि चकमकी झाल्या आहेत. या ताज्या घडामोडींमुळे जेरुसलेम शहरातला जुना धार्मिक वाद उफाळून आला आहे. हे शहर तीन धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे.

जेरुसलेम (Jerusalem) हे शहर ख्रिश्चन (Christian), ज्यू (Jewish) आणि मुस्लीम ( Muslim) नागरिक अत्यंत पवित्र मानतात. या शहराला अनेक शतकांचा इतिहास आहे. त्या इतिहासात अनेक वादविवादांचाही समावेश आहे. तरीही त्या शहराबद्दलअसलेल्या पावित्र्याची भावना कमी झालेली नाही.

जेरुसलेम चा इतिहास

हिब्रू भाषेत येरुशलायिम आणि अरेबिकमध्ये अल-कुड्स या नावाने ओळखलं जाणारं जेरुसलेम हे शहर जगातल्या सर्वांत जुन्या शहरांमध्ये गणलं जातं. ते शहर अनेकांनी जिंकून घेतलं,अनेकांनी उद्ध्वस्त केलं आणि अनेक वेळा ते पुन्हा उभारलंही गेलं.

विविध धर्मांच्या नागरिकांमधल्या वादांमुळे हे शहर प्रामुख्याने चर्चेत असतं, तरी या भूमीच्या पावित्र्याविषयीच्या श्रद्धेबद्दल त्यांचं एकमत आहे. बीबीसीच्या लेखानुसार, ओल्ड सिटी (Old City) हा या भूमीचा गाभा असून,तिथे छोटे चिंचोळे रस्ते आणि ख्रिस्ती, मुस्लीम, ज्यूइश आणि आर्मेनियन अशा चार भागांचं वेगळेपण दाखवणाऱ्या ऐतिहासिक इमारती आहेत. त्या साऱ्याभोवती एखाद्या गढीप्रमाणे दगडी भिंत असून,त् यात जगातल्या काही पवित्र स्थळांचा समावेश आहे.

प्रत्येक भाग आपापल्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो

वर उल्लेखलेला प्रत्येक भाग आपापल्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो. यातले दोन भाग ख्रिश्चनांचे आहेत. कारण आर्मेनियनदेखील ख्रिश्चनच आहेत. आर्मेनियनांचा भाग सर्वांत छोटा असून, जगातल्या सर्वांत जुन्या आर्मेनियन सेंटर्सपैकी (Armenian Centers) ते एक आहे.

आर्मेनियन भाग सेंट जेम्स चर्च आणि मोनेस्ट्रीने व्यापला असून, त्या समुदायाने त्यांची खास संस्कृती आणि नागरीकरण त्यात जपलं आहे.

चर्च (The Church)

ख्रिश्चनांच्या भागात दी चर्च ऑफ दी होली सेपल्कर (The Church of the holy Sepulchre)असून, त्यावर जगभरातल्या ख्रिश्चनांची मोठी श्रद्धा आहे. जीझसची कथा, त्याचा मृत्यू, क्रुसिफिकेशन आणि पुनर्जन्म या साऱ्या कथांशी निगडितअसलेल्या स्थळावर हे चर्च उभं आहे.

अनेक ख्रिस्ती परंपरांनुसार, जीझसना (Jesus)इथे क्रूसावर चढवण्यात आलं होतं. त्यांची समाधी इथे आत आहेआणि त्यांचा पुनर्जन्मही इथेच झाला होता असं मानलं जातं.

ख्रिश्चनांच्या विविध शाखांच्या प्रतिनिधींकडून या चर्चचं व्यवस्थापन केलं जातं. त्यात ग्रीक ऑर्थोडॉक्स पॅट्रिआर्केट, रोमन कॅथलिक चर्चमधले फ्रान्सिस्कन फ्रायर्स आणिआर्मेनियन पॅट्रिआर्केट यांचा प्रामुख्याने समावेश होतो. इथिओपियन्स, कॉप्टिक्स आणि सीरियन ऑर्थोडॉक्स चर्चचाही त्यात समावेश होतो.

जगभरातल्या लाखो ख्रिश्चनांचं हे तीर्थस्थळ आहे. जीझसच्या रिकाम्या समाधीला ते भेट देतात आणि प्रार्थना करतात.

मशीद (The Mosque)

जेरुसलेमच्याचार मुख्य भागांपैकी मुस्लिमांचा भाग सर्वांत मोठा आहे. डोम ऑफ रॉक (Dome of Rock)आणि अल अक्सा मशीद (Al Aqsa Mosque)ही मुस्लिमांची तीर्थस्थळंइथे आहेत. ही मशीद हराम अल शरीफ नावाच्या पठारावर उभी आहे.

ही मशीद म्हणजे इस्लाममधलं तिसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थळ असून,वक्फ या इस्लामिक ट्रस्टतर्फे तिचं व्यवस्थापन पाहिलं जातं.

प्रेषित मोहम्मद त्यांच्या रात्रीच्या प्रवासादरम्यान मक्केतून इथे आले आणि सर्व प्रेषितांच्या आत्म्यांसह त्यांनी प्रार्थना केली,असं मुस्लिम मानतात.तिथून काही पावलांवर डोम ऑफ दी रॉक हे तीर्थस्थळ आहे. तिथे फाउंडेशन स्टोनअसून, प्रेषित मोहम्मद तिथून स्वर्गात गेले, असं मुस्लिम मानतात.

मुस्लिम वर्षभर इथे भेट देत असतात; पण रमजानच्या महिन्यात दर शुक्रवारी हजारो मुस्लिम इथे प्रार्थनेला येतात.

दी वॉल (The Wall)

ज्यूंच्या भागात कोटेल किंवा वेस्टर्न वॉल (Western Wall)आहे. कोणे एके काळी ज्या शिखरावर पवित्र मंदिर उभं होतं, त्याची ती शिल्लक राहिलेली भिंत आहे. त्या मंदिरात होली ऑफ दी होलीज (Holy of the holies)अर्थात ज्यू धर्मीयांची सर्वांत पवित्र जागा होती.

ज्यू असं मानतात, की ज्यापासून जगाची निर्मिती झाली, तो फाउंडेशन स्टोन इथे होता. याच जागी अब्राहमने त्याच्या इसाक या मुलाच्या त्यागाची तयारी केली. अनेक ज्यू असं मानतात, की डोम ऑफ दी रॉक हेच होली ऑफ दी होलीजचं स्थळ होतं.

आज वेस्टर्न वॉल येथे ज्यूप्रार्थना करतात. वेस्टर्न वॉलचं व्यवस्थापन रब्बी ऑफ वेस्टर्न वॉलकडून केलं जातं. दर वर्षी तिथे जगभरातले लाखो ज्यू धर्मीय प्रामुख्याने हाय हॉलिडेजमध्ये भेट देतात, प्रार्थना करतात, आपल्या वारशाशी ‘कनेक्ट’ होतात.

Title – तीन धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जेरुसलेम चा इतिहास प्रत्येकाला माहीत असायला हवा ( Everyone should know the history of Jerusalem, the place of worship of the three religions )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लीम देश ठरला UAE

Team webnewswala

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी

Team webnewswala

भारताने केला एअर बबल करार आता बिनधास्त करा विमान प्रवास

Team webnewswala

Leave a Reply