Team WebNewsWala
व्यापार

अखेर टिकटॉक ने भारतातुन गाशा गुंडाळला

सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने (Indian Government) बाईटडान्स कंपनीच्या टिकटॉकसह (TikTok) हॅलो अॅपवर (Hello App) बंदी घातली होती.

नवी दिल्ली : चीनी सोशल मीडिया कंपनी ByteDance ने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने (Indian Government) बाईटडान्स कंपनीच्या टिकटॉकसह ( TikTok ) हॅलो अॅपवर (Hello App) बंदी घातली होती. ही बंदी अद्यापही कायम आहे. त्यानंतर आता बाईटडान्स कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याचं जाहीर केलं आहे. टिकटॉक चे जागतिक अंतरिम प्रमुख वेनेसा पाप्पस आणि जागतिक व्यवसाय समाधानचे उपाध्यक्ष ब्लेक चांडली यांनी भारतातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला असून त्यात या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या भारतातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.

भारतात पुन्हा व्यवसाय सुरू करण्याबद्दल अनिश्चितता

ByteDance कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतात पुन्हा व्यवसाय सुरू करण्याबद्दल अनिश्चितता व्यक्त केली. कंपनीने म्हटलं, “भारतात पुन्हा व्यवसाय कधी सुरू करु हे आम्हाला ठाऊक नाही. आम्ही आमच्या अॅप्सकडून स्थानिक कायद्यांचे, नियमांचे पालन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले आमचे अॅप्स कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाहिये.”

भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा

बाईटडान्समधील एका सूत्राच्या मते, कंपनीने बुधवारी एक टाऊन हॉलचे आयोजन केलं होतं जेथे कंपनीने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली.

या संदर्भात TikTok कंपनीच्या प्रवक्त्यांसोबत संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, २९ जून २०२० रोजी बारत सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यात येत आहे. गेल्या सात महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत की भारतातील आमचे अॅप्स केव्हा सुरू होतील मात्र, याबाबत स्पष्टता नाहिये. आम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे भारतातील सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची टीम कमी करण्याशिवाय आमच्याकडे आता कोणताही पर्याय नाहीये. ही बाब खूपच खेदजनक आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी

Team webnewswala

कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल

Team webnewswala

काय आहे Google Tax, कंपन्यांना लागेल Equalisation levy

Web News Wala

Leave a Reply