Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय पर्यावरण

मॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता

जपानचे जहाज ब्राझील ला जात असताना मॉरिशस येथे अडकून डुबायला सुरुवात झाली. मॉरिशस मध्ये ऑइल गळती मुळे पर्यावरणीय आणीबाणी झाली आहे.

पोर्ट लुईस : मॉरिशस च्या समुद्र किनाऱ्याजवळील एका जहाजातून सातत्याने तेलगळती (Oil Leakage) होत आहे. हे जहाज दोन भागांमध्ये तुटण्याची (Ship Will Break) शक्यता व्यक्त केली जात आहे.

मॉरिशस संकट तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता

जर असं झालं तर हे एक भलमोठं Environmental Disaster ठरू शकतं. मॉरिशसच्या किनाऱ्याजवळ भटकलेलं जहाज दोन भागात तुटू शकतं. एमवी वाकाशियो जापानी कंपनी मित्सुई ओएसके लाइन्स द्वारा संचालित एक कार्गो जहाज आहे. हे जहाज चीनहून  ब्राजील जात होतं. मात्र मध्यात 25 जुलै रोजी मोठ्या दगडामध्ये अडकल्यानंतर गुरुवारी जहाजातून समुद्रात तेलगळती सुरू झाली.

आतापर्यंत 1,000 मेट्रिक टन तेलाची गळती

या जहाजातून हिंद महासागराच्या लॅगूनमध्ये तब्बल 1,000 मेट्रिक टन तेलाची गळती झाली आहे. तज्ज्ञांना भीती आहे की जहाज तुटलं तर पर्यावरणासाठी हा मोठा धोका ठरू शकतो. गुरूवारी तेलगळती सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने सफाई अभियान सुरू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये हजारो स्थानिक प्रतिनिधी मदत करण्यासाठी मॉरिशनच्या पूर्व भागात येत आहेत.

नक्की वाचा >>
मॉरिशस मध्ये ऑइल गळतीमुळे पर्यावरणीय आणीबाणी
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या
अद्यापही जहाजात 2,500 मेट्रिक टन तेल आले शिल्लक

ग्रीनपीस इंटरनॅशनलचे माजी रणनीतिकार आणि मॉरिशसमधील संसदेचे माजी सदस्य सुनील डॉवरकासिंग यांनी सांगितले की अद्यापही जहाजाच्या टॅकमध्ये तब्बल 2,500 मॅट्रिक टन इंधन आहे आणि जहाजात तीन टँक आहेत. ज्यातील एक टँकेतून तेलगळती होत आहे. सध्या ही गळती थांबविण्यात आली आहे आणि सध्या दुसरं ऑपरेशन सुरू आहे. ज्यामध्ये जहाज तुटल्यानंतर पहिल्यांदा एक टँकरमधून आणि त्यानंतर इतर टँकमधून तेल बाहेर काढण्यासाठी उपयोग बचाव टीम काम करेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मिठी नदीला आला पूर, महिलेसह तीन मुली गेल्या वाहून

Team webnewswala

राष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी

Web News Wala

‘Annathe’ सेटवर ८ करोना बाधीत रजनीकांत क्वारंटाइन

Web News Wala

1 comment

Leave a Reply