Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय पर्यावरण

पर्यावरण दिन श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

5 जूना पर्यावरण दिन आहे त्याच्या दोन दिवस आधी एक मोठं श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर

पर्यावरण दिन श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

Webnewswala Online Team –  5 जूनला पर्यावरण दिन आहे त्याच्या दोन दिवस आधी एक मोठं पर्यायवरणीय संकट उभं राहण्याच्या शक्यतेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिंगापूरमध्ये नोंदणी झालेल्या एक्स-प्रेस पर्ल नावाच्या या जहाजाला गेल्या दोन आठवड्यांपासून आग लागलेली होती.

आता यातून शेकडो टन इंजिन ऑईल बाहेर पडून ते समुद्राचं पाणी प्रदूषित करेल आणि सागरी जीवांना त्याचा धोका असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.श्रीलंका आणि भारताची नौदलं गेल्या काही दिवसांपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. आगीमुळे ते मोडून समुद्रात बुडू नये यासाठी हे प्रयत्न सुरू होते.

समुद्रातील जोरदार लाटा आणि मान्सून वाऱ्यामुळे या प्रयत्नांमध्ये अनेकदा अडथळे

“जहाज बुडत आहे. किनारवर्ती प्रदेशातील पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून बुडण्यापूर्वी त्याला खोल समुद्राच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते इंडिका सिल्वा 

श्रीलंकेच्या नेगोम्बो शहराच्या जवळ या जहाजाचे तुटलेले काही भाग आणि तेल दिसून येत आहेत.

मत्स्यपालन विभागाच्या राज्यमंत्र्यांनी नेगोम्बो खाडीमध्ये जहाजांना येण्यास मज्जाव केला आहे तसेच पानादुरा आणि नेगोम्बो या पट्ट्यामध्ये मासे पकडण्यास तात्काळ बंदी घातली आहे. हे जहाज सध्या ज्या ठिकाणी आहे तेथे ते बुडत असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

खाडीच्या आसपास जहाजाचे कोणत्याही प्रकारचे भग्नावशेष किंवा गळती झालेलं तेल यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंगापूरची एक्स-प्रेस शिपिंग कंपनीच्या मालकीचं हे जहाज आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांना या गळतीची माहिती होती असं या कंपनीने स्पष्ट केलं आहे.

जहाजाच्या कप्तानाविरोधात तक्रार दाखल

आग लागेपर्यंत त्यांना भारत आणि कतारने जहाज सोडण्याची परवानगी दिली नव्हती असं कंपनीने सांगितलं आहे.या दोन देशांनी परवानगी नाकारल्यावर श्रीलंकेनं त्याला आपल्या हद्दीत येण्यास परवानगी दिली. हे समजल्यावर श्रीलंकेतील सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी जहाजाच्या कप्तानाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कप्तान आणि जहाजाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यामध्ये वाचवण्यात आलं होतं. जहाजाच्या कप्तानाची आणि इंजिनियरची 14 तास चौकशी केल्याची माहिती श्रीलंका पोलिसांनी दिली.

Web Title – पर्यावरण दिन श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज ( Environment Day A ship full of sinking chemicals near Sri Lanka )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

लवकरच मुंबईतील नद्या होणार प्रदूषणमुक्त

Team webnewswala

लवकरच मुंबईचे खारट पाणी होणार गोड

Web News Wala

लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI

Team webnewswala

Leave a Reply